Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना आमिर खानचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 19:08 IST

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना आमिर खान भावुक झाला होता.

मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्टला गळफास घेत आत्महत्या केली. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांचे सेट त्यांनी उभारले होते. आर्थिक विंवचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी(४ ऑगस्ट) एन.डी. स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन देसाई यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी एन.डी, स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होतं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. सुबोध भावे, मानसी नाईक, अभिजीत केळकर हे कलाकार उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेता आमिर खाननेही नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांना अखेरचा निरोप देताना आमिर खानचे डोळे पाणावले होते.

वडिलांना अखेरचा निरोप देताना लेकीचा आक्रोश, नितीन देसाईंच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘अजिंठा’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी कला दिग्दर्शकाचं काम पाहिलं होतं. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ते लालबागचा राजाच्या मंडपाची उभारणी करणार होते. त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होते. कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांचं म्हणणं आहे. त्यांनी खालापूर पोलीस ठाण्यात एका फायनान्स कंपनीविरोधात तक्रार नोंदवली आहे.  

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईआमिर खानबॉलिवूड