Join us

धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवून अभिनेत्रीला लुटलं, घरातील कर्मचाऱ्यांनेच केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 12:08 IST

अभिनेत्रीला तिच्या राहत्या घरी बंदुकीचा धाव दाखवत तिच्यात घरातील एका कर्मचाऱ्याने लुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अभिनेत्रीला तिच्या राहत्या घरी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यात घरातील एका कर्मचाऱ्याने लुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंदुक निकिताच्या मानेवर ठेवत चोरट्यांनी रोख साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांनी तिला धमकी दिली की जर तिने त्यांच्या मागण्या मान्य केला नाहीत तर ते तिला ठार मारतील. आपला जीव गमावण्याच्या भीतीने निकिताने त्यांना पैसे दिले. चोरी करायला आलेल्यांपैकी एक निकिताच्या घरी काम करणारा नोकर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने टोळीतील इतर काही सदस्यांसह योजना आखली होती. घरात कुणीही नसताना त्याने हा डाव साधला.

निकिताने मुंबईच्या मालाड बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करतायेत.निकिता म्हणाली की, तिला जबरदस्त धक्का बसला आहे  की हा दरोडा तिच्याच घरातील कर्मचाऱ्यांनी घातला आहे. ''लोक आधी विश्वास संपादन आणि नंतर त्याचा असा गैरवापर करतात हे खूपच त्रासदायक आहे. त्या चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये आणि सर्व दागिने हिसकावले आहेत जे मी खूप मेहनतीने जमावले होते. मी तक्रार दाखल केली आहे. मी जीवंत आहे हीच मोठी गोष्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी परत मिळवता येतील.'' 

निकिता रावल अनिल कपूर स्टारर फिल्म ब्लॅक अँड व्हाईट आणि अक्षय कुमार-जॉन अब्राहमसोबत गरम मसाला चित्रपटात दिसली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीगुन्हेगारी