Join us
Daily Top 2Weekly Top 5

के एल राहुलला 'ती' म्हणाली 'दादा' अन् सगळेच बनले 'मामा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:43 IST

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल अभिनेत्री निधी अग्रवालच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल अभिनेत्री निधी अग्रवालच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी केएल राहुल - निधी अग्रवाल यांच्या डिनर डेटच्या फोटोंमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले होते. दोघांच्याही या डेटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर के. एल राहुलची मॅच पाहायला निधी स्टेडियमवरही पोहोचली होती. पण आता के. एल राहुल व निधीच्या अफेअरच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. 

निधीने स्वत:चं या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. होय, ज्या के. एल राहुलला लोकांनी निधीचा बॉयफ्रेन्ड ठरवले, त्याला निधीने भाऊ म्हणून संबोधले. राहुलला शुभेच्छा देताना तिने ‘आॅल द बेस्ट ब्रो’ असे लिहिले. निधीच्या या पोस्टवरून तिच्यात व राहुलमध्ये तसले काहीही नसल्याचे स्पष्ट झालेय. यापूर्वी राहुलनेही निधी व तो केवळ चांगले मित्र असल्याचे सांगितले होते.

या आयपीएलच्या सत्रामध्ये केएल राहुलनेही किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे निधी अग्रवाल काही दिवसांपूर्वीच ‘मुन्ना मायकल’ या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात टायगर श्रॉफ तिचा हिरो होता. मात्र या सिनेमाला बॉक्स आॅफिसवर कमाल करता आली नाही. मात्र या चित्रपटाने निधी अग्रवालला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. बंगळुरुची असणा-या निधीने मॉडेलिंग केले असून मिस दिवा 2014 ची स्पर्धक होती.

टॅग्स :लोकेश राहुल