Join us

कॉमेडियन किकू शारदा व गौरव गेराने उडवली खिल्ली, भडकली नेहा कक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 10:04 IST

‘इंडियन आयडल’ची जज असलेली नेहा सध्या जाम भडकली आहे. याला कारणही तसेच आहे.

ठळक मुद्देया संपूर्ण प्रकारावर नेहाचा भाऊ टोनी कक्कर यानेही संताप व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर कायम चर्चेत आहे. पण ‘इंडियन आयडल’ची जज असलेली नेहा सध्या जाम भडकली आहे. याला कारणही तसेच आहे. एका कॉमेडी शोमध्ये नेहाची उंची आणि गाणे गातानाचे तिचे हावभाव यावरून तिची खिल्ली उडवली गेली. कॉमेडियन किकू शारदा व गौरव गेरा यांनी नेहाची खिल्ली उडवली. ही खिल्ली नेहाच्या अशी काही जिव्हारी लागली की, एक भली मोठी पोस्ट लिहित या शोच्या मेकर्सला तिने फैलावर घेतले.

संबंधित शोचा व्हिडीओ शेअर करत, नेहाने झालेल्या प्रकाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. ‘अशा प्रकारचा नकारात्मक आणि अपमानास्पद शो बनवणा-यांचा धिक्कार आहे. मला कॉमेडी आवडते. पण हा संपूर्ण प्रकार हास्यास्पद आहे. माझ्या नावाचा वापर बंद करा. माझ्याबद्दल तुमच्या मनात इतका द्वेष असेल तर माझ्या गाण्यांवर नाचणे बंद करा. ते एन्जॉय करणे बंद करा,’ असे नेहाने लिहिले. माझी गाणी एन्जॉय करता आणि यानंतर माझी अशी टर उडवता. तुम्हाला लाज वाटत नाही? हे प्रचंड त्रासदायक आहे, असेही नेहाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 

यानंतर अन्य एका पोस्टमध्ये नेहाचा राग काहीसा शांत झालेला दिसला. ‘मी अशा नकारात्मक वातावरणात जगू शकत नाही. त्यामुळे जे झाले ते विसरून जा. माझ्या चाहत्यांना विनंती आहे की तुम्ही देखील विसरुन जा. कारण देव सगळे बघतो आहे. देवच त्यांना शिक्षा करेल,’ असे ती म्हणाली.

नेहाचा भाऊही संतापलाया संपूर्ण प्रकारावर नेहाचा भाऊ टोनी कक्कर यानेही संताप व्यक्त केला. ‘माझ्या बहिणीची तिच्या उंचीवरुन उडवलेली खिल्ली मला बिलकूल आवडली नाही. ती अफाट मेहनत, जिद्द आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचली आहे. कुठल्याही व्यक्तीची त्याच्या शरीरावरुन अशी खिल्ली उडवणे योग्य नाही,’ अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :नेहा कक्करकिकू शारदा