Join us

सिखनी बहोत याद आती है म्हणत ऋषी कपूर यांनी केले होते नीतू सिंग कपूर यांना प्रपोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:27 IST

ऋषी कपूर पॅरिसमध्ये होते तर नीतू काश्मीरमध्ये शूटिंग करत होत्या. त्यावेळी ऋषी यांनी तार करून नीतू यांना प्रपोज केले होते.

ठळक मुद्देऋषी कपूर यांनी तार करून लग्नाची मागणी कशी घातली, याचा किस्सा देखील नीतू सिंग कपूर यांनी सांगितला. त्यांनी सांगितले की, “त्यावेळी तो पॅरिसमध्ये होता तर मी काश्मीरला शूटिंग करत होते आणि अचानक एक दिवस ऋषीची तार आली...

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हर्ष आणि भारती हे जोडपे इंडियन आयडॉल १२चे पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी हजेरी लावत असतात.

बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांचे मनोबल वाढवतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से देखील सांगतात. इंडियन आयडॉलचा हा भाग ऋषी कपूर विशेष भाग असणार आहे आणि त्यासाठी नीतू सिंग कपूर कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धक ऋषी कपूर यांची सदाबहार गाणी सादर करणार आहेत.

दानिश आणि नचिकेतने ‘बचना ए हसीनों’ आणि ‘छू कर मेरे मन को’ ही गाणी सादर केली. या परफॉर्मन्सनंतर नीतू सिंग कपूर यांनी सांगितले की, ऋषीची प्रेयसी असण्याआधी मी त्याची चांगली मैत्रीण होती. मुलींना कसे पटवायचे या टिप्स मी त्याला द्यायची. परंतु मग आम्ही दोघे एकमेकांना डेट करू लागलो. आम्ही दोघे एकमेकांना बॉब असे म्हणत असू. आम्ही एकमेकांना दिलेले ते लाडाचे नाव होते.

ऋषी कपूर यांनी तार करून लग्नाची मागणी कशी घातली, याचा किस्सा देखील नीतू सिंग कपूर यांनी सांगितला. त्यांनी सांगितले की, “त्यावेळी तो पॅरिसमध्ये होता तर मी काश्मीरला शूटिंग करत होते आणि अचानक एक दिवस ऋषीची तार आली, त्यात त्याने लिहिले होते की, सिखनी बहुत याद आती है.. तो मला खूप मिस करतो आहे आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे.”

टॅग्स :ऋषी कपूरनितू सिंग