Join us

ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावुक झाल्या नीतू सिंग; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:06 IST

ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील एक सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे नीतू सिंग. नुकत्याच त्या ऋषी कपूर यांच्या आठवणीत खुप भावुक झाल्या. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावरून त्या पती ऋषी कपूर यांना मिस करत आहेत, हे जाणवते.

 बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे एक दशक गाजवले आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखों दिवाने आहेत. त्यांचा चाहतावर्ग त्यांना कायम मिस करतो. ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील एक सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे नीतू सिंग. नुकत्याच त्या ऋषी कपूर यांच्या आठवणीत खुप भावुक झाल्या. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावरून त्या पती ऋषी कपूर यांना मिस करत आहेत, हे जाणवते.

नीतू सिंग यांनी शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्यासोबत ऋषी कपूर देखील दिसत आहेत. हा फोटो एखाद्या पार्टीतला असावा असे वाटते. नीतू सिंग या खुर्चीवर बसलेल्या आहेत आणि ऋषी कपूर हे हातात ग्लास घेऊन त्यांच्या बाजूला उभे आहेत. फोटोत अजून काही लोक दिसत असून ऋषी कपूर हे सुटाबुटात दिसत आहेत. 

त्यांनी शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘आपल्या सर्वांनाच आयुष्यात लहान-मोठी लढाई प्रत्येकालाच लढावी लागते. तुमच्याकडे सर्व काही सुख-सुविधा असतानाही तुम्ही दु:खी असू शकता आणि तुमच्याकडे सर्व सुख नसतानाही तुम्ही आनंदी असू शकता. हे सर्व केवळ आपल्या मनातच असते. सर्वांना एका चांगल्या आणि आशावादी भविष्याची अपेक्षा असते. धन्यवाद, आशावादी राहा, मेहनत करा. कुटुंबियांची काळजी घ्या, कारण तेच तुमच्या सुखदु:खात तुमच्या सोबत असतात.’

टॅग्स :ऋषी कपूरनितू सिंग