Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही एकाच घरात राहतो पण...", आलिया-रणबीरबद्दल नीतू कपूर यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:57 IST

आलिया-रणबीरच्या आयुष्याबद्दल नीतू कपूर उघडपणे बोलल्या

आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेतलं कपल आहे. त्यांना राहा ही गोंडस मुलगी आहे. आलिया आणि रणबीर दोघंही आपल्या कामासोबतच लेकीलाही तितकाच वेळ देतात. काही दिवसांपूर्वीच ते नवीन घरात शिफ्ट झाले. रणबीरची आई नीतू कपूरही त्यांच्यासोबत याच  घरात राहतात. 'एकाच घरात असलो तरी मी आलिया-रणबीरला स्पेस देते, त्यांच्यात ढवळाढवळ करत नाही' अशी प्रतिक्रिया नुकतीच नीतू कपूर यांनी दिली आहे.

नीतू कपूर यांनी सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. तेव्हा त्या म्हणाल्या, "रणबीर खूप चांगला पिता आहे, आलियाही चांगली आई आहे. दोघंही उत्तमरित्या पालकत्व निभावत आहेत. दोघंही कामात खूप व्यग्र असतात पण तरी मुलीसाठीवेळ काढतात आणि तिची काळजी घेतात."

त्या पुढे म्हणाल्या, "मला वाटतं जेव्हा मुलांचं लग्न होतं तेव्हा त्यांच्या स्पेसमध्ये आपण ढवळाढवळ करु नये. त्यांना मोकळं सोडलं पाहिजे.  मी मुलांसोबत एकाच बिल्डिंगमध्ये राहते पण म्हणून मी कधीही मला वाटेल तेव्हा घरात घरात फिरत नाही. मी त्यांना त्यांची स्पेस देते. आई काय नेहमीच इथे बसलेली असते असं त्यांना वाटू नये याची मी काळजी घेते. त्यांच्या प्रायव्हसीमध्ये मी हस्तक्षेप करत नाही. इतकंच काय राहा सुद्धा माझ्याजवळ तेव्हाच असते जेव्हा त्या दोघांना वेळ नसतो. मी न सांगता असं कधीही तिच्याकडे जात नाही. 

"जेव्हा रिद्धिमाचं लग्न झालं तेव्हाही मी ऋषी कपूर यांना सांगायचे की तिला रोज फोन करु नका. तिचं आता लग्न झालं आहे. भरतही तिथे आहे तुम्ही तिला सारखा फोन करु शकत नाही. तुम्हाला आता बाजूला व्हावं लागेल. कधीतरी एखाद्या वेळी कॉल करा पण असं उठसूठ करु नका. त्यांचंही आयुष्य आहे."

आलियाला घाबरुनच असते राहा

नीतू कपूर म्हणाल्या, "आलिया रणबीरमध्ये आलिया जास्त शिस्तबद्ध आहे. ती राहासोबतही तशीच असते. तिची एक नजरही राहासाठी पुरेशी असते. त्यामुळे राहा आलियाला थोडी घाबरुनच असते. तर रणबीर मात्र राहासोबत मित्रासारखा असतो. त्यामुळे ती रणबीरसोबत असताना एकदम मोकळी वागते. त्यांची मस्ती, खेळणंच चालू असतं. मी सुद्धा आलिया म्हणते की, 'अगं मला राहाला एक चॉकलेट तरी देऊ दे ना'. पण आलिया नको म्हणते. राहासाठी इतकी साखर चांगली नाही असं तिचं असतं." 

English
हिंदी सारांश
Web Title : Neetu Kapoor reveals about Alia-Ranbir's living arrangement, parenting style.

Web Summary : Neetu Kapoor shares Alia and Ranbir provide each other space despite living together. She praises their parenting, noting Ranbir's fun approach and Alia's disciplined style with their daughter, Raha. Neetu respects their privacy.
टॅग्स :नितू सिंगबॉलिवूडआलिया भट