Join us

​प्रभुदेवाला सोडून ‘या’ व्यक्तिला डेट करतेयं नयनतारा! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 15:09 IST

साऊथची आघाडीची अभिनेत्री नयनतारा सध्या आपल्या जुन्या बॉयफ्रेन्डला सोडून नव्या बॉयफ्रेन्डसोबत मस्ती करताना दिसतेय. अलीकडे नयनताराने आपला वाढदिवस साजरा ...

साऊथची आघाडीची अभिनेत्री नयनतारा सध्या आपल्या जुन्या बॉयफ्रेन्डला सोडून नव्या बॉयफ्रेन्डसोबत मस्ती करताना दिसतेय. अलीकडे नयनताराने आपला वाढदिवस साजरा केला. पण यावेळी नयनतारासोबत दुसरीच एक व्यक्ती दिसली. ती म्हणजे, दिग्दर्शक विग्नेश शिवम. होय,आता नयनताराला नवा बॉयफ्रेन्ड मिळाला, हे तर तुम्हाला कळले. पण तिचा जुना बॉयफ्रेन्ड कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नयनताराच्या जुन्या बॉयफ्रेन्डचे नाव आहे, प्रभुदेवा.नयनतारा व विग्नेशहोय, प्रभुदेवा. विग्नेशआधी नयनतारा प्रभुदेवासोबत लिव्ह- इनमध्ये राहत होता. अर्थात नंतर दोघांचेही ब्रेकअप झाले आणि नयनतारा प्रभुदेवाला सोडून निघून गेली.नयनतारा व विग्नेशयानंतर नयनतारा विग्नेशच्या प्रेमात पडली. याचवर्षी नयनतारा व विग्नेश यांनी आपले रिलेशनशिप आॅफिशिअल केले होते. सिंगापूरच्या एका अवार्ड शोमध्ये दोघांनीही सोबत एन्ट्री घेतली होती.नयनतारा व विग्नेशविग्नेश नयनताराला प्रेमाने थनगमेय बोलवतो. तूर्तास विग्नेश ‘थाना सुरेन्द्र कोट्टम’ या चित्रपटात बिझी आहे. यात अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री कार्ति लीड रोलमध्ये आहेत.ALSO READ : ‘या’ अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी निर्मात्यांना तैनात करावे लागले २०० बाउंसर्स, वाचा काय आहे प्रकरण!नयनताराने प्रभुदेवाला ‘उद्धस्त’ केले, असे म्हटले जाते.  २००८ पासून प्रभुदेवा व नयनतारा एकमेकांना डेटींग करत होते. पण प्रभुदेवाची पत्नी कोर्टात गेली तेव्हा नयनताराने असे काही नसल्याचे अगदी शिरजोरपणे सांगितले होते. एकीकडे माझ्यात व प्रभुदेवात काहीही नसल्याचे नयनतारा सांगत होती तर दुसरीकडे प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. नयनतारानेही प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्मही स्विकारला होता. ती आधी ख्रिश्चन होती. २०११मध्ये प्रभुदेवाने नयनतारासाठी पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते त्याने तोडले. यापोटी प्रभुदेवाला   १० लाख रुपए, शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले. यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा प्रभुदेवाचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभुदेवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले. तेव्हापासून प्रभुदेवा एकटा आहे. त्याच्याकडे फार कामही नाहीये. अधूनमधून तो सिनेमा दिग्दर्शित करतो. कामामध्ये त्याने स्वत:ला गुंतवून घेतले आहे.