Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीची ‘ही’ अभिनेत्री झळकणार ‘मोक्ष टू माया’ या चित्रपटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 19:00 IST

‘मोक्ष टू माया’ या चित्रपटात बिदिता बाग ही महत्त्वाच्या भूमिकेत असून मेघना मलिक  इतर सहकलाकारांसोबत दिसणार आहे. चित्रपटात एहसान खान, राज प्रेमी, नीरज भारद्वाज, मुनि झा, श्वेता ठाकोर, मैत्रिक ठक्कर, मेघा भट्ट, करण राजानी, सिमा परी आणि राहुल सिन्हा हे कलाकार देखील दिसतील.

मनोज सिंग दिग्दर्शित आणि कपिल कौस्तुभ शर्मा लिखित ‘मोक्ष टू माया ’ या चित्रपटाची कहानी ‘माया’ च्या चरित्राभोवती फिरते. ती तिच्या आयुष्यातील इच्छा-अपेक्षांचा निर्णय घेते. तसेच इर्षा, हाव, दु:ख या सर्व गोष्टींना घेऊन पुढे सरकते. चित्रपटाची निर्मिती अंतरा क्रिएशन एलएलपी, श्वेता ठकोर, नीरज भारद्वाज, रमेश राजपुरोहित, कृष्णाजी यांनी केले आहे. 

‘मोक्ष टू माया’ या चित्रपटात बिदिता बाग ही महत्त्वाच्या भूमिकेत असून मेघना मलिक  इतर सहकलाकारांसोबत दिसणार आहे. चित्रपटात एहसान खान, राज प्रेमी, नीरज भारद्वाज, मुनि झा, श्वेता ठाकोर, मैत्रिक ठक्कर, मेघा भट्ट, करण राजानी, सिमा परी आणि राहुल सिन्हा हे कलाकार देखील दिसतील.

दिग्दर्शक मनोज सिंग म्हणाले,‘आम्ही संपूर्ण टीमसाठी हे खूप महत्त्वाचे आहे की, चाहत्यांना हा चित्रपट, त्याची कथा, कलाकारांची भूमिका कशी वाटते, यावर सर्व अवलंबून आहे. समाजातील पुरूषवर्गासाठी हा चित्रपट असून महिलांना प्रकाशमय मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून आम्ही केला आहे. या चित्रपटात असे भावनिक अनेक बंध आहेत ज्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मदत करतील. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट २६ जुलैला रिलीज होणार आहे.                                                             

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी