नवाझुद्दीन सिद्दीकीला आपल्या पत्नीवर संशय असल्याने त्याने केले असे काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 12:32 IST
नवाझुद्दीन सिद्दीकीने अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे या चित्रपटापासून त्याच्या कारकिदीला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याच्या अफलातून अभिनयामुळे प्रेक्षकांनी त्याला ...
नवाझुद्दीन सिद्दीकीला आपल्या पत्नीवर संशय असल्याने त्याने केले असे काही...
नवाझुद्दीन सिद्दीकीने अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे या चित्रपटापासून त्याच्या कारकिदीला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याच्या अफलातून अभिनयामुळे प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले. या चित्रपटानंतर त्याचे संपूर्ण नशीबच बदलले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्याने आजवर गँग्स ऑफ वासेपूर, पान सिंग तोमर, तलाश, रईस, बजरंगी भाईजान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर येणाऱ्या ठाकरे या चित्रपटात नवाझुद्दीन बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीने गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचे चित्रपट प्रेक्षक नेहमीच डोक्यावर घेतात. पण गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला आहे. त्याच्या आत्मचरित्रावरून चांगलाच वाद रंगला होता. त्याने त्याच्या आत्मचरित्रात त्याच्या काही जुन्या अफेअरविषयी लिहून वाद ओढवून घेतला होता. आता तर नवाझुद्दीन एका वेगळ्याच प्रकरणात अडकला आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनच्या पत्नीचे सीडीआर काढले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र तीन वेळा बोलावूनही अद्याप नवाजुद्दीन चौकशीसाठी आलेला नाही. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ ने नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याची पत्नी आणि त्यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांना समन्स बजावले आहे. पत्नीच्या कॉल रेकॉर्ड आणि ठावठिकाण्यांवर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाझने सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स मागवल्याची माहिती समोर येत आहे.नवाझुद्दीन याचा आपल्या पत्नीवर विश्वास नसल्याने ती कोणाशी बोलते, कुठे जाते हे जाणून घेण्यासाठी त्याने हे रेकॉर्ड्स मागवले असल्याची चर्चा आहे. पण नवाझला कोणतेही समन्स आले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट लिहून सांगितले आहे की, काल मी माझ्या मुलीला तिचे शाळेतील प्रोजेक्ट करायला मदत करत होतो आणि त्यानंतर तिच्यासोबत शाळेत गेलो होतो. कालपासून मीडिया माझ्यावर काहीही आरोप लावत आहेत.Also Read : या कारणामुळे सलमान खान नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या पार्टीत