Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकीने 'Sacred Games 2' साठी मागितले दुप्पट मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:12 IST

'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन रसिकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे'सेक्रेड गेम्स'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलासर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत नवाजुद्दीनच्या नावाचा समावेश

'सेक्रेड गेम्स' या वेेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. त्याच्या या  वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील नवाजच्या तोंडी असलेले डायलॉग्स तर खुपच गाजले. तेव्हा 'सेक्रेड गेम्स'मधल्या नवाजुद्दीनच्या भूमिकेला मिळालेली लोकप्रियता पाहता त्याने आपल्या मानधनात दुप्पट वाढ केल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्या सीझनपेक्षा दुप्पट मानधन मागितले आहे. त्यामुळे सैफला या वेब सीरिजसाठी जितके मानधन देण्यात आले तितकेच मानधन आता नवाजुद्दीन सिद्दीकीला देण्यात येणार आहे. मी जितके मानधन मागतो तेवढे मानधन मोठे निर्माते द्यायला तयार होतात. माझी जेवढी पात्रता आहे तितकेच मानधन मी मागितले आहे असे नवाजुद्दीन म्हणाला.'सेक्रेड गेम्स'च्या यशानंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत नवाजुद्दीनच्या नावाचा समावेश झाला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा प्रमुख भूमिका असलेला व नंदिता दास दिग्दर्शित 'मंटो' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुढील वर्षी नवाजुद्दीन सिद्दीकीचा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीनच्या सेक्रेड गेमच्या दुसऱ्या सीझनची तरूण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी