Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकीनं गावाकडे खरेदी केली जमीन, झाला कोटींचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:05 IST

नवाजुद्दीनने कोटींची जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. 

आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. उत्तर प्रदेशातील एका लहानशा खेड्यातून आलेल्या नवाजुद्दीन सिद्दिकीचा बॉलिवूडमधील प्रवास अत्यंत खडतर होता. सुरुवातीच्या काळात अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला आणि अनेक वर्षे छोटी-मोठी कामे करावी लागली. पण, आज तो  बॉलिवूडमधील सर्वात ताकदवान अभिनेत्यांपैकी एक आहे. एकेकाळी वॉचमन अन् केमिस्ट म्हणून काम करणारा नवाजुद्दीन सिद्दिकी आज मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अशातच नवाजुद्दीनने कोटींची जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी गुरुवारी (१२ मार्च) ते उत्तर प्रदेशातील आपल्या पैतृक गावी गेला होता. यावेळी तेथील रजिस्ट्रार कार्यालयात कागदपत्रांवर स्वाक्षरी करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानं ५५ बिघा (अंदाजे ३४–३५ एकर) शेतीयोग्य जमीन खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जमिनीची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे, नवाजुद्दीनने ही जमीन केवळ स्वतःच्या नावावर न घेता, आपले भाऊ फैजुद्दीन, अलमासुद्दीन आणि माजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह इतर सात जणांच्या सहकार्याने खरेदी केली आहे. सब-रजिस्ट्रार पंकज कुमार जैन यांच्या उपस्थितीत या जमिनीच्या व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण झाली. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी रजिस्ट्रार कार्यालयाबाहेर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर नवाजुद्दीनने आपल्या आईची भेट घेऊन तिचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर तो मुंबईकडे रवाना झाला.

२०० कोटींची मालमत्ता आणि आगामी प्रोजक्टनवाजुद्दीन सिद्दीकीची एकूण संपत्ती १६० ते २०० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. एका चित्रपटासाठी तो साधारण ६ कोटी रुपये मानधन घेतो. मुंबईतील वर्सोवा येथे त्याचा १२.८ कोटींचा आलिशान बंगला असून, त्याच्या ताफ्यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि फोर्ड एंडेव्हर यांसारख्या महागड्या कारचा समावेश आहे. १९९९ मध्ये 'सरफरोश'मधून पदार्पण करणारा नवाजुद्दीन गेल्या २७ वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. २०२५ मध्ये तो 'थामा' आणि 'रात अकेली है' मध्ये दिसला होता. आता लवकरच तो 'सेक्शन १०८', 'तुंबाड २' आणि 'द ग्रेट एस्केप फरार' यांसारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nawazuddin Siddiqui Buys Land in Village, Crores Worth Transaction

Web Summary : Nawazuddin Siddiqui, once a watchman, purchased land worth crores in his ancestral village in Uttar Pradesh. He bought approximately 34-35 acres of agricultural land with his brothers. The land deal, valued at ₹6 crore, was completed in the presence of officials, after which he took his mother's blessings.
टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी