Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनची नोकरांना मारहाण, भावानेच शेअर केली Audio रेकॉर्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 08:58 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे

Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. आधी पत्नी आणि आता सख्खा भाऊही नवाजुद्दीनबाबत अनेक खुलासे करत आहे. त्याच्यावर आरोपांच्या फैरी सुरुच आहेत. आता तर नवाजुद्दीनच्या मॅनेजरची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. नवाजने त्याच्या नोकरांना अनेकदा मारहाण केल्याचं यामध्ये ऐकू येत आहे. भाऊ शमास सिद्दीकी (Shamas Siddiqui) यानेच ही ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे.

शमास सिद्दीकी याने एक ऑडिओ क्लिप ट्वीट करत नवाजला धमकीच दिली आहे. होळीचं गिफ्ट मिळालं असं त्याने म्हणलं आहे. नवाजुद्दीनच्या स्टाफचा मॅनेजर सांगतोय की त्याच्या नोकरांना नवाजने दुसऱ्यांदा मारहाण केली आहे. इतकंच नाही तर लवकरच व्हिडिओ सुद्धा रिलीज करु असं त्याने लिहिलं आहे. 

दोन व्यक्तींमधील हे कॉल रेकॉर्डिंग आहे. एक म्हणतो 'एक गोष्ट सांग, अवधेशने मला सांगितलं की आज पुन्हा मोनूला मारलं? दुसरा म्हणतो, ‘हो सर’. कधी मारलं? ‘शूट होतं त्या दिवशी सकाळी, दोनदा मारलं.’ किती दिवस झाले या गोष्टीला? ‘ही तर आताची गोष्ट आहे’. तू आधी सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा घडलं का ? ‘होय सर, ते तर आधी झालं होतं. हे आताच घडलं आहे.' 'चल, मी त्याच्याशी आरामात बोलेन. हे अत्यंत चुकीचं आहे. मी माझ्या रितीने त्याच्याशी बोलेन.' असा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतोय.

बस्स..आता खूप झालं! पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीननं मौन सोडलं; शेअर केलं लांबलचक पत्र

नवाजुद्दीनचं हे कौटुंबिक प्रकरण सध्या कोर्टात सुरु आहे. पत्नी आलियाने लावलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे तो अधिकच अडचणीत आला आहे. आता तर त्याच्या भावाने ऑडिओ क्लिप पब्लिश केल्याने नवाजुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीपरिवारन्यायालय