Join us  

सर्जरीसाठी मुंबई पोहोचलेल्या दिव्यांग चिमुकलीला पाहताच सोनू सूद जमिनीवर बसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 9:41 AM

बिहारच्या नवादा जिल्ह्यातून चार हात आणि चार पाय असलेल्या विशेष चिमुकली चौमुखी कुमारी सर्जरीसाठी मुंबईत पोहोचली आहे.

नवादा-

बिहारच्या नवादा जिल्ह्यातून चार हात आणि चार पाय असलेल्या विशेष चिमुकली चौमुखी कुमारी सर्जरीसाठी मुंबईत पोहोचली आहे. जिथं तिची बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्याशी भेट झाली. चिमुकलीला पाहून सोनू सूद थेट जमिनीवर बसला आणि तिला चॉकलेट देऊ केलं. त्यानं चौमुखीशी गप्पा देखील मारल्या. चौमुखीची माहिती सोनू सूद याला तिच्या गावचे सरपंच दिलीप रावत यांनी दिली होती. 

दिलीप रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू सूदनं चौमुखीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून मुलीच्या उपचारासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे आता नवादा येथे लवकरच एक चांगलं रुग्णालय बांधण्याचं आश्वासन सोनू सूद यानं दिलं आहे. तसंच या विशेष मुलीला चांगलं शिक्षण मिळावं यासाठीही तो प्रयत्न करणार आहे. चौमुखी सोमवारी तिचे आई-वडील आणि सरपंचासह मुंबईला रवाना झाली. सोनू सूद सतत माझ्या संपर्कात होता आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यानं दिलं, असं सरपंच दिलीप रावत यांनी सांगितलं.

सोनू सूदला देव मानू लागलेत ग्रामस्थगावचे सरपंच दिलीप रावत यांनी याआधी चौमुखी हिला पाटणाच्या आयजीआयएमएसमध्ये घेऊन गेले होते. पण तेथील डॉक्टरांनी क्रिटिकल केस असल्याचं सांगून इथं सर्जरी होणं शक्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर दिलीप रावत यांनी अभिनेता सोनू सूद याचा मोबाइल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला आणि सर्व घटनेची माहिती दिली. त्यावर सोनू सूदनं क्षणाचाही विलंब न करता मुलीला मुंबईत घेऊन येण्यास सांगितलं आणि इथं सारंकाही ठिक होईल असं आश्वासन देखील दिलं. त्यानंतर चौमुखीचे आई-वडील तिला घेऊन मुंबईत पोहोचले आहेत. सोनू सूदनं व्हिडिओ कॉल करत चौमुखीच्या आई-वडिलांशी चर्चा केली होती. तसंच चौमुखीला देखील पाहिलं होतं. त्यावेळी व्हिडिओ कॉलमध्ये सोनू सूदला पाहण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाला होता. ग्रामस्थ आता सोनू सूदला देव मानू लागले आहेत. 

कुटुंबातील पाच सदस्यांपैकी चार जण दिव्यांगचौमुखीच्या कुटुंबातील पाच जणांपैकी चार जण दिव्यांग आहेत. चौमुखी, आई उषा देवी, वडील वसंत पासवान आणि भाऊ अमित कुमार दिव्यांग आहेत. फक्त चौमुखीची थोरली बहिण पूर्णपणे फीट आहे. आता ज्या घरातील पाच सदस्यांपैकी चार जण दिव्यांग असतील त्या घराची स्थिती काय असेल याचा फक्त विचार करा. दिव्यांग दाम्पत्य मजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. 

टॅग्स :सोनू सूदमहाराष्ट्र