Join us

नर्गिस, कुणाचं गं बाळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 11:05 IST

 नर्गिस फाख्री भारत सोडणार की काय? या चर्चेला मध्यंतरी फारच उधाण आले होते. मात्र ती कुठेही जाणार नसल्याचे तिनेच ...

 नर्गिस फाख्री भारत सोडणार की काय? या चर्चेला मध्यंतरी फारच उधाण आले होते. मात्र ती कुठेही जाणार नसल्याचे तिनेच स्पष्ट केले आहे. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ज्यात ती एका लहान बाळाला कडेवर घेऊन उभी आहे. ते बाळ फारच क्यूट दिसत आहे.ती म्हणते,‘ लव्ह लाफ लाईव्ह मंचकिन माय फ्रेंड्स मेक ब्युटीफुल बेबीज.’ नुकतीच नर्गिस ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटात दिसली होती. चित्रपट कॉमेडी असून तिच्यासोबत अभिषेक बच्चन दिसणार आहे.‘ढिशूम ’ चित्रपटात तिला एक लहान भूमिका देण्यात आली आहे. सध्या ती ‘बँजो’ चित्रपटातील तिच्या किट्टीची आतुरतेने वाट पाहत आहे. यात तिच्यासोबत रितेश देखमुख आहे.