Join us

करीना कपूर आणि सैफ अली खानच्या मुलांना सांभाळण्यासाठी नॅनी घेते इतके रूपये; किंमत वाचून येईल तुम्हाला भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 13:14 IST

Kareena Kapoor And Saif Ali Khan : करीना कपूर आणि सैफ अली खानची दोन्ही मुलं खूप चर्चेत येत असतात.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. करीना कपूर आणि सैफ अली खानची मुले जेह (Jeh) आणि तैमूर (Taimur) हेदेखील तितकेच चर्चेत येत असतात. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. करीना आणि सैफचा मोठा लेक तैमूर हा पाच वर्षांचा आहे तर जेह हा एक वर्षाचा आहे.  बऱ्याचदा जेह आणि तैमूर यांच्या सोशल मिडीयावरील व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत एक नॅनी दिसते. ही नॅनी तैमूर आणि जेहचा सांभाळ करते. त्यासाठी ती लाखो रूपये फी घेते. 

मीडिया रिपोर्टनुसार तैमूर आणि जेह यांना सांभाळण्यासाठी नॅनी दीड लाख रुपये फी घेते. या नॅनीचे नाव सावित्री असून तैमूरचा जन्म २०१६ साली तेव्हापासून तिने त्याला सांभाळायला सुरूवात केली. त्यानंतर जेहचा जन्म झाला. त्यालादेखील ही नॅनीच सांभाळते.

करीना कपूर आणि सैफ अली खानने २०१२ साली लग्नबंधनात अडकले. २०१६ साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२१ ला जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे.  

करिना कपूरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर तिचा लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. करिनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरतैमुर