Join us

अन् वाजिद खानबद्दलच्या ‘त्या’ सगळ्या बातम्या ठरल्या निव्वळ अफवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 21:05 IST

म्युझिक डायरेक्टर वाजिद खानच्या चाहत्यांना आज दुपारी एक बातमी कळली आणि अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली. ही बातमी होती, वाजिदच्या प्रकृतीबद्दलची. 

म्युझिक डायरेक्टर वाजिद खानच्या चाहत्यांना आज दुपारी एक बातमी कळली आणि अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली. ही बातमी होती, वाजिदच्या प्रकृतीबद्दलची. काल रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर वाजिद खानला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची गंभीर स्थिीत बघून डॉक्टरांनी लगेच अँजिओप्लास्टी केली. यादरम्यान वाजिदचे कुटुंब रात्रभर रूग्णालयात होते, असे या बातमीत सांगण्यात आले होते़. ही बातमी ऐकली आणि चाहते चिंतीत झाले़त. पण आता चिंता मिटलीय. होय, कारण ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बातमीनंतर काही तासांत खुद्द वाजिदने आपण अगदी ठणठणीत असल्याचे ट्विट केले.

माझ्याबद्दल ज्या काही बातम्या आहेत, त्या सगळ्या अफवा आहेत. मी एकदम ठणठणीत आहे. अर्थात या सगळ्या बातम्यानंतर चाहत्यांनी दर्शवलेली चिंता, शुभेच्छा पाहून माझ्यावर तुम्ही सगळे किती प्रेम करता हे मला कळले. मी केवळ तुमचे आभार मानू इच्छितो. आज मला स्वत:ला खरचं खूप स्पेशल असल्यासारखं वाटतयं, असे ट्विट वाजिदने केले.तुम्हाला ठाऊक आहेच की साजिद-वाजिद या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. या जोडीचे सलमान खानसोबत जबरदस्त ट्युनिंग आहे. साजिद-वाजिद व सलमानने मिळून वाँटेड, पार्टनर आणि दबंगमध्ये धमाकेदार गाणी दिलीत. सलमान यानेच साजिद-वाजिद जोडी ‘प्यार किया तो डरना का’ या आपल्या चित्रपटातून ब्रेक दिला होता. यानंतर ही जोडी खान कुटुंबाच्या अगदी जवळची म्हणून ओळखली जाते. साजिद-वाजिद दोघही आपल्या यशाचे श्रेय सलमानला देतात.