‘रॉक आॅन 2’ च्या अँथम साँगमध्ये अशी दिसते मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 21:01 IST
मुंबईला नव्या रूपात पाहायचे असेल तर ‘रॉक आॅन 2’च्या अँथम साँगमधून पाहता यते.
‘रॉक आॅन 2’ च्या अँथम साँगमध्ये अशी दिसते मुंबई
स्वप्न नगरी मुंबईला अनेक चित्रपटातून पाहिले आहे. दिवसाच्या गर्दीपासून ते येथील नाईटलाईफ दाखविण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटातून करण्यात आला आहे. मात्र मुंबईला नव्या रूपात पाहायचे असेल तर ‘रॉक आॅन 2’च्या अँथम साँगमधून पाहता यते. ‘रॉक आॅन’ या गाण्याचा पहिला व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. या गाण्याला मुंबईच्या विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी शूट करण्यात आले आहे. सोबनतच या गाण्यात असलेले व्हिज्युअल इफेक्टस पाहण्यासारखे आहेत. रॉक आनच्या या गाण्याला मुंबईच्या अशा लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे जेथे कधी रात्र होतच नाही. या गाण्यात व्हिक्टोरिया टर्मिनल्स, एअर इंडिया बिल्डिंग, गेट वे आॅफ इंडिया, बीएमसी इमारतीसह विविध ठिकाणी शूट करण्यात आले आहे. सामान्यत: या ठिकाणी गर्दी कधीच कमी झालेली पहायला मिळत नसल्याचे सांगण्यात येते. रॉक आॅन 2 चे हे अँथम साँग जुण्या रॉक आॅनच्या थीमसॉमवरच आधारित असले तरी यात श्रद्धा कपूरचा आवाज लक्ष वेधून घेणारा आहे. या गाण्याचे म्युझिक लाऊंड आहे. रॉक आॅन-2 चे गाणे रिलीझ झाल्यापासूनच हिट ठरली आहेत. 11 नोव्हेंबरला ‘रॉक आॅन 2 ’प्रदर्शित होत असून यात फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रॉक आॅन 2 ची शूटिंग भारताच्या पूर्वेकडील राज्यात करण्यात आली आहे. यापूर्वी कधीच या भागात शूटिंग क रण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र अँथम साँगमधून मुंबईचे दर्शन घडविण्याचे कारण तरी काय असावे हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पण त्यापूर्वी रॉक आॅन 2 चे हे जबरदस्त गाणे पहाच...