Join us

फॅशन चित्रपटातील मुग्धा गोडसे या अभिनेत्याशी करणार लवकरच लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 13:13 IST

‘बिग बॉस10’मध्ये दिसलेला अभिनेता राहुल देव आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात ...

‘बिग बॉस10’मध्ये दिसलेला अभिनेता राहुल देव आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे कपल लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तिने स्वतःच या गोष्टीचे संकेत दिले आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात तिने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी ती लवकरच लग्न करणार असल्याचे तिने म्हटले आहे.राहुल देव आणि मुग्धा येत्या महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. राहुल देवचे हे दुसरे लग्न असणार आहे. राहुल आणि रिनाचे लग्न १९९८ ला झाले होते. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. पण २००९ मध्ये रिनाचे कर्करोगाने निधन झाले. रिनाच्या निधनानंतर काहीच वर्षांनी मुग्धा त्याच्या आयुष्यात आली. आता राहुल आणि मुग्धा काहीच दिवसांत लग्न करणार आहेत. राहुलने बॉलिवूडमध्ये अनेक हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकरल्या आहेत. राहुल आणि मुग्धा गेल्या अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अलाहाबादमध्ये एका रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी आलेल्या मुग्धाने पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या लग्नाची बातमी दिली.राहुल आणि मुग्धा गेल्या चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दोघांच्याही वयात १८ वर्षांचा फरक आहे. राहुल ४८ वर्षांचा आहे तर मुग्धा ३१ वर्षांची आहे. मुग्धा गोडसे सध्या बॉलिवूडमध्ये फार सक्रिय दिसत नाही. ती मिस इंडिया २००४ची सेमी फायनलिस्ट होती. मुग्धाने २००८ मध्ये मधुर भंडारकरच्या ‘फॅशन’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यांनतर तिने आॅल द बेस्ट, हेल्प, जेल, हिरोईन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मुग्धा आणि राहुल यांनी पॉवर कपल या रिअॅलिटी शो मध्ये देखील हजेरी लावली होती. ते दोघे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे फोटो नेहमीच शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंना त्यांचे फॅन्स भरभरून लाइक्स देतात. ते काही दिवसांपूर्वी व्हेकेशनसाठी श्रीलंकेला देखील गेले होते.  Also Read : मुग्धा गोडसेने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पेट्रोल पंपावर केले होते काम