Join us  

अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला होता इतक्या रुपयांचा आहेर, रक्कम वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:19 PM

जया बच्चन यांच्या हातातल्या एक एन्व्हलपने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमध्यले सगळ्यात हॉट कपल पैकी एक आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या ते एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत. सोशल  मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सच्या संपर्कात असतात. दीपिका आणि रणवीर यांचे कपल त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. ते दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र हजेरी लावतात. तसेच त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी इटलीत नोव्हेंबर 2018 ला लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे मित्रमैत्रीण आणि नातलग उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी बी-टाऊनच्या सेलिब्रेटींसाठी मुंबईत वेगळे रिसेप्शन दिले होते. 

या लग्नात अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती. या रिसेप्शनमध्ये जया बच्चन यांच्या हातातल्या एक एन्व्हलपने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या एन्व्हलपने जया बच्चन यांनी नेमक काय आणले आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या एन्व्हलपमध्ये दुसरे तिसरे काही नसून पैसे असल्याचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी केलेयं. बिग बीनी पैसे दिले म्हणजे नेमकं किती दिले असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला असल्याचे. तर अमिताभ यांनी 101 रुपयांचा आहेर दिल्याचा स्वत: खुलासा केला आहे. 101 रुपये देण्या मागचे कारण ही त्यांनी स्पष्ट केले आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या लग्नात ज्युनिअर आर्टिस्ट आणि मेकअप मॅन येण्यास संकोच करायचे, याच कारणास्तव बिग बीनी 101 रुपये भरण्याची सुरुवात केली. 

टॅग्स :अमिताभ बच्चनरणवीर सिंगदीपिका पादुकोण