Join us

श्री. व सौ. जैन! अंकिता लोखंडेनं शेअर केला बेडरूम व्हिडीओ, होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 11:11 IST

Ankita Lokhande Video : लग्न आनंदात पार पडलं, नव्या नवरीचा गृहप्रवेश झाला आणि आता काय तर अंकिताचा एक बेडरूम व्हिडीओ व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे  (Ankita Lokhande) नुकतीच लग्नबेडीत अडकली. तिच्या या लग्नाची विकी व कतरिनाच्या लग्नाइतकीच चर्चा झाली. या लग्नाचा थाट पाहून सगळ्यांचे डोळे दिपले. लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल झालेत. लग्न आनंदात पार पडलं, नव्या नवरीचा गृहप्रवेश झाला आणि आता काय तर अंकिताचा एक बेडरूम व्हिडीओ व्हायरल होतोय.

अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच रोमँटिक आहे. व्हिडीओत अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत (Vicky Jain) रील बनवताना दिसून येत आहे.   अंकिता आणि विकी दोघांनीही व्हाईट कलरचा नाईट ड्रेस घातला आहे. हा नाईट ड्रेसही खास डिझाईन करून घेतला आहे. होय, यावर मिस्टर अँड मिसेस जैन असं लिहिलं आहे.  अंकिताचा हा बेडरूम व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.काल मिस्टर अँड मिसेस जैन लग्नानंतर पहिल्यांदा मीडियाला पोझ देताना दिसले होते. यावेळी अंकिताने निळ्या रंगाची डिझायनर साडी घातली होती. हातात लाल चुडा आणि भांगेत कुंकू असा अंकिताचा लुक सोशल मीडियावर ‘हिट’ झाला होता.

गत 14 डिसेंबरला अंकिता व विकीने लग्नगाठ बांधली. त्याआधी  हळदीपासून तर मेहंदी पर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी आपल्या मित्रांसोबत मोठी धम्माल करताना दिसून आले होते. अंकिताच्या संगीत सेरेमनीला कंगना राणौतनेही हजेरी लावली होती. याशिवाय अंकिताच्या खास मैत्रिणी अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावे या दोघीही यावेळी हजर होत्या.

टॅग्स :अंकिता लोखंडे