Join us
Daily Top 2Weekly Top 5

'क्वीन' सिनेमात कंगणा राणौतच्या हातावर काढलेल्या मेहंदीची किंमत वाचून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल,मग रिअलमध्ये क्वीनचा कसा आहे तामझाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 12:40 IST

बॉलिवूडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता हृतिक रोशनसह सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. बेधडक आणि बिनधास्त ...

बॉलिवूडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता हृतिक रोशनसह सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगली आहे. मात्र याच काळात आलेला तिचा सिमरन हा सिनेमा रसिकांच्या मनावर छाप पाडू शकला नाही.असं असलं तरी क्वीन या सिनेमातील भूमिकेनं कंगणाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.त्यामुळे आजही या सिनेमाशी संबंधित गोष्टींची चर्चा तितकीच रंगत असल्याचे पाहायला मिळते. क्वीन या सिनेमातील कंगणाची भूमिका रसिकांना भावली होती.या सिनेमात कंगणाच्या हातावर मेंहदी काढण्यात आली होती. या सिनेमातील भूमिकेला अनुसरुन ही मेंहदी साकारण्यात आली होती. सिनेमातील दृष्य रिअल वाटावी या अनुषंगाने कंगणाच्या हातावर काढण्यात आलेल्या मेंहदीचा रंग काहीसा फिका ठेवण्यात आला होता. त्यामुळेच कंगणाच्या हातावर काढलेली ही मेंहदी सिनेमात लक्ष वेधून घेते. मात्र ही मेहंदी काढण्यासाठी मोजावी लागलेली किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाही. या मेंहदीसाठी 60,000 रू इतके रुपये मोजावे लागले होते. रुपेरी पडद्यावर आपल्या भूमिकेबाबत कंगणा फार काळजी घेत असते. ती भूमिका अधिकाधिक लक्षवेधी ठरावी यासाठी कितीही पैसा लागला तरी बेहतर असं तिचं ठाम मत असतं हेच क्वीन सिनेमातील मेंहदीवरुन समोर येत आहे. रिल लाइफमध्ये सुंदर दिसण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेली कंगणा प्रत्यक्ष जीवनात कशी असेल याची कल्पना तुम्ही नक्कीच केली असेल. रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप कंगणाचा असतो. त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते.कधी कधी दिवसातून होणा-या तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये कंगणा 3 विविध पद्धतीच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये अवतरते. कंगणाने आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. त्यामुळे ड्रेसिंग स्टाईलसह शूज, बॅग, गॉगल यामध्येही विविध प्रकारचे नवनवे ब्रँड्स कंगणाकडे पाहायला मिळतात.त्यामुळे रिल लाइफमध्ये फॅशनिस्ट असणारी कंगणा रिअल लाइफमध्येही सुंदर दिसण्यासाठी तितकाच तामझाम करते. रसिकांनी प्रेमाने दिलेले बॉलिवूडची क्वीन हे नाव सार्थ ठरवण्याचा बहुदा कंगणाचा हा प्रयत्न असावा नाही का?