मौनी रॉय (Mouni Roy) ही एक लोकप्रिय भारतीय टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने 'नागिन' मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळवली. तिने करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांपासून केली असून आता ती हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. मौनी रॉय सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामुळं मौनी ही प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
नुकताच मौनी रॉयचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती मॅजेंटा रंगाच्या अनारकली सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये मौनी वारंवार तिचा दुपट्टा पोटावर धरून 'बेबी बंप' (Baby Bump) लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून, अनेकांनी तिचं अभिनंदनही करायला सुरुवात केली आहे.
मौनीने वारंवार दुपट्टा सावरल्यामुळे अनेकांना ती प्रेग्नंट असल्याचा संशय आला. मात्र, दुसरीकडे मौनीच्या नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम फोटोंमध्ये तिची फिगर नेहमीप्रमाणेच 'स्लिम' दिसत आहे. त्यामुळे ही केवळ कॅमेरा अँगल किंवा दुपट्टा सावरण्याची एक सवय असू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप मौनी किंवा तिचा पती सूरज नंबियार यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सूरज नंबियारसोबतचं सुखी वैवाहिक आयुष्य
मौनी रॉयने २०२२ मध्ये दुबईस्थित व्यावसायिक सूरज नंबियारसोबत गोव्यात मोठ्या थाटात लग्न केले होते. २०१९ मध्ये एका पार्टीत त्यांची पहिली भेट झाली होती आणि तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. मौनी सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत आनंदी आहे. चाहत्यांना आता त्यांच्याकडून गुड न्यूज कधी मिळते, याची प्रतीक्षा आहे.
Web Summary : Mouni Roy's recent video sparked pregnancy rumors. Seen in an Anarkali suit, she appeared to hide her stomach with her dupatta, leading to speculation. Some fans noted her slim figure in Instagram photos, suggesting it may be camera angles. Official confirmation is awaited.
Web Summary : मौनी रॉय के हालिया वीडियो ने गर्भावस्था की अफवाहों को जन्म दिया। अनारकली सूट में दिखने पर, वह अपने दुपट्टे से पेट छिपाती हुई दिखीं, जिससे अटकलें लगाई जा रही हैं। कुछ प्रशंसकों ने इंस्टाग्राम तस्वीरों में उनके स्लिम फिगर पर ध्यान दिया, जिससे पता चलता है कि यह कैमरे के कोण हो सकते हैं। आधिकारिक पुष्टि का इंतजार है।