Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाच्या चर्चावर मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:59 IST

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तिची फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.

 Mouni Roy Reacts On Divorce Rumours : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.  इतकंच नव्हे तर मौनी आणि सूरज गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याचंही समजतंय. सोशल मीडियावर घटस्फोटाच्या अफवांनी जोर धरल्यानंतर आता मौनी रॉयने मौन सोडले. मौनीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

मौनीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. तिने लिहिले, "मी सर्व मीडिया हाऊसेसना विनंती करते की, त्यांनी खोट्या बातम्या पसरवणे थांबवावे. आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आम्हाला एकांत द्या". आपल्या पोस्टच्या शेवटी तिने हात जोडलेला इमोजी वापरत अफवा थांबवण्याचे आवाहन केले आहे.

अफवांना सुरुवात कशी झाली?
मौनी आणि सूरज यांच्यातील दुराव्याच्या चर्चांमागे काही प्रमुख कारणे समोर आली होती. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले असून लग्नाचे फोटोही डिलीट केल्याचे नेटीझन्सच्या लक्षात आले. दुबईस्थित व्यावसायिक असलेल्या सूरजने मौनीची आर्थिक फसवणूक केल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. यानंतर सूरजने मंगळवारी संध्याकाळी आपले सोशल मीडिया अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केले आहे.

चार वर्षांचा संसार
२०१९ मध्ये पहिली भेट झाल्यानंतर मौनी आणि सूरज २७ जानेवारी २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले होते. गोव्यात बंगाली आणि मल्याळी अशा दोन्ही रितीरिवाजांनुसार हा शाही विवाहसोहळा पार पडला होता. अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करणारे हे जोडपे अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mouni Roy responds to divorce rumors, asks media to stop lies.

Web Summary : Mouni Roy addressed divorce rumors with Suraj Nambiar after speculation arose from social media activity. Roy urged media outlets to respect their privacy and cease spreading false information, denying marital issues.
टॅग्स :मौनी राॅयघटस्फोट