'आई' हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं स्वयंपाकघरात सतत काम करणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, स्वतःपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणारी स्त्री. पण तिच्याही काही इच्छा, स्वप्नं आणि भावना असतात, हे अनेकदा नकळत दुर्लक्षित होतं. याच भावनांना स्पर्श करणारा एक सुंदर कौटुंबिक चित्रपट म्हणजे 'इंग्लिश विंग्लिश' (English Vinglish).
'मदर्स डे' निमित्त हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. साधी पण भावनिक कथा आणि आईच्या आत्मसन्मानाचा प्रवास दाखवणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. चित्रपटाची कथा शशी गोडबोले या गृहिणीभोवती फिरते. यांनीश्रीदेवी साकारलेली शशी आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत करत असते. पती, मुलं आणि सासूची काळजी घेताना ती स्वतःच्या भावना बाजूला ठेवते. मात्र, इंग्रजी नीट बोलता येत नसल्यामुळे तिची मुलगी आणि पती तिची खिल्ली उडवतात.
यानंतर शशी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय घेते आणि इंग्रजी बोलण्याचा कोर्स जॉइन करते. या प्रवासात ती केवळ भाषा शिकत नाही, तर स्वतःचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मानही परत मिळवते. चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो आणि आईच्या त्यागाची जाणीव करून देतो.
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गौरी शिंदे यांनी केलं होतं. शशीचं पात्र त्यांनी आपल्या आईपासून प्रेरित होऊन लिहिलं होतं. हा भावनिक आणि प्रेरणादायी चित्रपट तुम्ही ZEE5 आणि Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
Web Summary : Celebrate Mother's Day with 'English Vinglish,' a film about a housewife, Shashi, who learns English to regain her self-respect. The film portrays a mother's sacrifices and her journey of self-discovery. Stream on ZEE5 or Amazon Prime Video.
Web Summary : मदर्स डे पर 'इंग्लिश विंग्लिश' देखें, जो शशि नामक एक गृहिणी की कहानी है, जो आत्म-सम्मान हासिल करने के लिए अंग्रेजी सीखती है। यह फिल्म एक माँ के त्याग और आत्म-खोज की यात्रा को दर्शाती है। ZEE5 या Amazon Prime Video पर स्ट्रीम करें।