Join us  

बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानसोबत काम करायचं, मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्काची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 7:01 PM

बॉलिवूडचा बादशहा असलेल्या शाहरुखसोबत आपल्याला काम करायला आवडेल, अशी इच्छा मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्कानं व्यक्त केली आहे.

लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानसोबत अनेक नायिकांना काम करायला आवडतं. यात आता आणखी एका सुंदरीची भर पडली आहे. बॉलिवूडचा बादशहा असलेल्या शाहरुखसोबत आपल्याला काम करायला आवडेल, अशी इच्छा मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्कानं व्यक्त केली आहे.

मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का सध्या भारत दौऱ्यावर आली आहे. त्याचबरोबर मिस वर्ल्ड इंडिया सिनी शेट्टी आणि मिस वर्ल्ड कॅरेबियन देखील कॅरोलिनासोबत काश्मीर दौऱ्यावर हजर राहिल्या आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

#WATCH | Miss World Karolina Bielawska on her aspirations to work in Bollywood films"...It would be lovely to be in a movie of Shah Rukh Khan. I've had the privilege of meeting director Sajid Nadiadwala...and to also work with SLB (Sanjay Leela Bhansali) in the movies he has… pic.twitter.com/7juaE9JzRE— ANI (@ANI) August 29, 2023

 

यावेळी एका मुलाखतीमध्ये मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का म्हणाली की, "शाहरुख खानसोबत काम करायला आवडेल. तसेच मला दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांना भेटण्याचा मान मिळाला.  राजवाडे आणि राजकन्या दाखवल्या जाणाऱ्या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

यावेळी भारत या वर्षाच्या अखेरीस मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेचे आयोजन करत आहे.  भारताने यापूर्वी १९९६ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतात २७ वर्षांनी पुन्हा एकदा यजमानपद आले आहे. जवळपास महिनाभर ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत भारतासह १३० देशांच्या सुंदऱ्या सहभाग घेणार आहेत.

 

टॅग्स :बॉलिवूडविश्वसुंदरीसिनेमा