Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरसोबत मस्ती करताना दिसली मीशा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 11:37 IST

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची लाडकी लेक मीशासाठी हा महिना खूपच खास आहे. या महिन्यात शाहिदची लेक आपला ...

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची लाडकी लेक मीशासाठी हा महिना खूपच खास आहे. या महिन्यात शाहिदची लेक आपला पहिला बर्थ डे सेलिब्रेट करणार आहे. तिचा पहिला वाढदिवस खास बनवण्यासाठी शाहिद आणि मीरा राजपूत गेल्या आठवड्यात लंडना रवाना झाले आहेत. मीशाच्या पहिल्या व्हेकेशनचा फोटो समोर आला आहे. यात मीशा पापा शाहिद कपूरसोबत एन्जॉय करताना दिसते आहे. या फोटोंमध्ये मीशा शाहिदसोबत बॉल खेळताना दिसतेय.यात तिने लाल रंगाचा जॅकेट परिधान केला आहे. ज्यात ती खूपच क्यूट दिसते आहे. शाहिदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. या फोटोला शाहिदने एक कॅप्शनदेखील लिहिले आहे. प्ले टाईम विथ द लिटिल मीशा असे त्यांने लिहिले आहे.     ALSO READ : IIFA 2017 : Watch Video : ‘बुमरॅँग’ व्हिडीओमध्ये डॅडी शाहिद कपूरसोबत पहा मीशाचा क्युट अंदाज!!मीशा 26 ऑगस्टला 1 वर्षांची होणार आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मम्मी मीरा लेकीच्या बर्थ डे प्लनिंग करण्यात व्यस्त होती. तर डॅडी शाहिद कपूर संजय लीला भंसाली यांच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात शाहिद राणी पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. राणी पद्मावतीची भूमिका यात अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारणार आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीस सिंग दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिद विशेष मेहनत घेताना दिसतो आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.