Join us

  मीरा राजपूतने वडिलांना वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा...पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 12:01 IST

आज २६ नोव्हेंबर हा मीरा व शाहिदसाठी आनंदाचा दिवस आहे. होय, कारण आज मीराचे पापा आणि शाहिदचे सासरेबुवा यांचा वाढदिवस आहे.

ठळक मुद्दे. शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. 

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत आपल्या संसारात सुखी आहेत. गत ५ सप्टेंबरला मीरा व शाहिद यांच्या  दुस-या बाळाचा जन्म झाला, तेव्हापासून तर दोघेही जाम आनंदात आहेत. आज २६ नोव्हेंबर हाही मीरा व शाहिदसाठी आनंदाचा दिवस आहे. होय, कारण आज मीराचे पापा आणि शाहिदचे सासरेबुवा यांचा वाढदिवस आहे.

"Happy 60th Dad ❤️ From you we have learned to love, to pray, to excel, to thank, to live असे सुंदर कॅप्शन तिने लिहिले आहे.

फोटो तिने शेअर केले आहेत.

केवळ इतकेच नाही मुलगी मीशा आपल्या आजोबांसोबत खेळतानाचा एक फोटोही तिने पोस्ट केला आहे. 

शाहिद व मीराचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले होते. एक वषार्नंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. झेन हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. शाहिद कपूरमीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. 

टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूर