होय, ‘मेड इन इंडिया’ फेम मिलिंदला त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या मुलीसोबत अफेअर असल्यावरून नेटिझन्स विचित्र स्वरूपाच्या कमेण्ट त्याच्यावर करीत आहेत. मात्र मिलिंदवर नेटिझन्सच्या या कॉमेण्टचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. होय, मिलिंदने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तो ट्रोलर्सला एक मॅसेज देताना दिसत आहे.
}}}} ">Ankita&me with a #Troll with #VeryVeryBigEars and a #VeryVeryLongNose#Norwaypic.twitter.com/bH61ptgPYW— Milind Usha Soman (@milindrunning) November 14, 2017
गर्लफ्रेंड अंकितासोबत असलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये मिलिंदने लिहिले की, ‘अंकिता आणि मी, ट्रोल आमच्याकडे मोठे कान आणि एक लांब नाक आहे.’ हा फोटो एका कार्टूनसोबत काढण्यात आला आहे. या कार्टूनचे कान आणि नाक मोठे आहेत. दरम्यान, ५२ वर्षीय मिलिंद सोमणने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi हिच्याशी लग्न केले होते. मात्र हे लग्न यशस्वी ठरले नाही. तीन वर्षांतच दोघांचे नाते संपुष्ठात आले. आता तो अंकिताला डेट करीत आहे. अंकिताचे वय २० असून, पेशाने ती एअरहोस्टेस आहे.