Join us

आयर्न मॅन मिलिंद सोमण पुन्हा चर्चेत; पत्नीसोबतच्या वयाबाबत केला खुलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:20 IST

आता मात्र ते एका वेगळयाच कारणाने चर्चेत आहेत. ते म्हणजे मिलिंद सोमण यांच्या एका विधानामुळे. त्याची पत्नी अंकिता कोनवार हिच्याशी काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. त्या दोघांच्या वयात बरेच अंतर असून तो ५३ वर्षाचा तर ती २८ वर्षांची आहे.

आयर्न मॅन मिलिंद सोमणने गर्लफ्रेंड अंकिता कोवरसोबत २२ एप्रिलला थाटामाटात विवाहसोहळा थाटला. अलिबागमध्ये जवळचे नातेवाईक व खास मित्र परिवाराच्या उपस्थित या दोघांचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. अंकिता-मिलिंदच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या युनिक कपलने लग्नाच्या दोन दिवसांनंतर असा अनोखा उपक्रम राबवलाय की, ज्याचे सर्व जण कौतुक केले. आता मात्र ते एका वेगळयाच कारणाने चर्चेत आहेत. ते म्हणजे मिलिंद सोमण यांच्या एका विधानामुळे. त्याची पत्नी अंकिता कोनवार हिच्याशी काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. त्या दोघांच्या वयात बरेच अंतर असून तो ५३ वर्षाचा तर ती २८ वर्षांची आहे. त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांच्या या नात्याबाबत खूप चर्चा होताना दिसतात. या दोघांच्या रिलेशनशिपपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. मिलिंदनेही त्याचं नातं जगापासून न लपवता ते सर्वांसमोर खुलेपणाने मांडलं. अनेकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नही उपस्थित केले. बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

नुकतेच एका मुलाखतीत त्याने आपल्या आणि पत्नी अंकिताच्या वयाबाबत एक वक्तव्य केले. आमच्या दोघांच्या वयातील अंतर मी मानत नाही. दोन लोक वय, अनुभव, पार्श्वभूमी, संस्कृती याच्या बाबतीत कायमच वेगळे असणार. पण या सगळ्या गोष्टी समजून घेणे आणि मान्य करणे जास्त महत्त्वाचे आहे. तुमचे नाते सशक्त, सकारात्मक आणि चांगले राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी सोडाव्या लागतात. असे केले तरच तुमचा जोडीदार तुमच्यासोबत जुळवून घेऊ शकतो आणि याचा जोडीदाराला आपले ध्येय गाठण्यात नक्की उपयोग होतो. याचवेळी आपण कामाच्या निमित्ताने महिन्यातील २० दिवस फिरतीवर असल्याचेही त्याने सांगितले.

टॅग्स :मिलिंद सोमण