Join us

हा काय प्रकार? मुलींच्या वन पीसमध्ये मिलिंद सोमणचं फोटोशूट, अभिनेत्री म्हणाली- "माझ्याकडेही सेम ड्रेस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:18 IST

मिलिंद सोमण कायमच त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतात. सध्या ते एका फोटोशूटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगली आहे. 

मिलिंद सोमण बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अभिनयासोबतच मिलिंद सोमण त्यांच्या फिटनेससाठीही विशेष ओळखले जातात. पन्नाशीतही मिलिंद सोमण एकदम फिट दिसतात. मिलिंद सोमण कायमच त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतात. सध्या ते एका फोटोशूटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगली आहे. 

मिलिंद सोमण यांनी बाझार इंडिया या ब्रँडसाठी खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये त्यांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये त्यांनी मुलींचा लाँग वन पीस ड्रेस घातल्याचं दिसत आहे. मिलिंद सोमण या फोटोमध्येही एकदम फिट दिसत आहेत. पण हे फोटो पाहून मात्र काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. अनेकांना मिलिंद सोमण यांची ही फॅशन पटलेली नाही. 

टीव्ही अभिनेत्री सोन्या अयोध्या हिने मिलिंद सोमण यांच्या या फोटोवर कमेंट करत तिच्याकडेही सेमच ड्रेस असल्याचं दिसत आहे. एकाने कमेंट करत "सॉरी पण हा ड्रेस चांगला दिसत नाहीये", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "हे अजिबात कूल वाटत नाहीये", अशी कमेंट केली आहे. 

मिलिंद सोमण यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्याकडे फिटनेस आयकॉन म्हणून पाहिलं जातं. वयाच्या ५९व्या वर्षीही मिलिंद सोमण एकदम फिट आणि फाइन आहेत. ते दररोज न चुकता व्यायाम करतात. याचे अनेक व्हिडीओही ते पोस्ट करत असतात. 

टॅग्स :मिलिंद सोमण सेलिब्रिटी