Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेंटल हेल्थ बेस्ड सिनेमांचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:35 IST

नुकताच रिलिज झालेल्या शाहरूख खान आणि आलिया भट्ट स्टारर ‘डियर जिंदगी’ हा चित्रपट ‘मेंटल हेल्थ’वर फोकस करणारा आहे. सिनेमात ...

नुकताच रिलिज झालेल्या शाहरूख खान आणि आलिया भट्ट स्टारर ‘डियर जिंदगी’ हा चित्रपट ‘मेंटल हेल्थ’वर फोकस करणारा आहे. सिनेमात आलिया भट्ट हिच्या लहानपणीच्या अशा काही निगेटिव्ह आठवणी आहेत, ज्या मोठेपणी तिला तिच्या परिवारापासून दूर करतात. ती परिवारापासून दूर राहणे पसंत करते. याचदरम्यान तिची मनोचिकित्सकाच्या भूमिकेत असलेल्या शाहरूख खानशी भेट होते. तिच्यावर ट्रिटमेंट केल्यानंतर हळूहळू तिला आयुष्य सुंदर वाटतेय, अशीच काहीसी चित्रपटाची कथा आहे, परंतु मेंटल हेल्थवर फोकस करणारा हा पहिलाच चित्रपट आहे, असे नाही, तर यापूर्वीदेखील इंडस्ट्रीमध्ये अशाप्रकारच्या चित्रपटांची निर्मिती केली गेली. प्रेक्षकांनीदेखील या चित्रपटांना भरपूर पसंती दिली. याचाच घेतलेला हा आढावा...माय नेम इज खानया सिनेमात किंग खान ‘एस्पर्जर’ नावाच्या बिमारीने ग्रस्त असल्याचे दाखविण्यात आले आहे. जो मुलगा या आजाराने ग्रस्त असतो, त्याचा विकास इतर मुलांच्या तुलनेत मंद असतो. किंग खानदेखील या सिनेमात असामान्य तरुणाच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा चांगलाच भावला होता. तारे जमीन परया सिनेमातून दर्शील सफारी हा बालकलाकार बॉलिवूडमध्ये जबरदस्त पॉपुलर झाला आहे. मिस्टर परफेक्टनिस्टची भूमिका असलेल्या या सिनेमात दर्शील ‘डिस्लेक्सिया’ नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे दाखविण्यात आले आहे. या आजारामुळे सोप्यात सोपी गोष्टदेखील अवघड वाटायला लागते. सिनेमात दर्शीलच्या शिक्षकाच्या भूमिकेत आमिरने त्याला या आजारातून मुक्त करण्यासाठीचा केलेला संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक गल्ला जमविला. ‘पा’बॉलिवूडचे शहानशहा अमिताभ बच्चन यांनी ‘पा’ सिनेमात एका १३ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. ‘प्रोजेरिया’ नावाच्या आजाराने (या आजाराने लहान वयातच म्हातारपणाचे लक्षणे दिसतात) ग्रस्त असलेला हा मुलगा कशाप्रकारे जगण्याचा संघर्ष करतो हे दाखविले आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांचीही प्रमुख भूमिका आहे. मार्गरिटा विद ए स्ट्रॉकाल्कि कोचलिन हिची भूमिका असलेल्या ‘मार्गरिटा विद ए स्ट्रॉ’ या सिनेमात ती ‘सेलब्रल पॉल्जी’ या आजाराने ग्रस्त असल्याचे दाखविण्यात आले आहे. या आजारामुळे एखादी गोष्ट करण्यासाठी रुग्णाला बराचसा वेळ लागतो. काल्किच्या सिनेमातील भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले. फिर मिलेंगेया सिनेमात सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी एचआयव्ही बाधित व्यक्तींची भूमिका साकारली आहे. सिनेमाची संपूर्ण कथा एड्स या विषयाच्या अवतीभोवती फिरतेय. यू, मी और हमअजय देवगण आणि काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात काजोलने ‘अल्जायमर’ नावाच्या आजाराने पीडित असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे. रानी मुखर्जी हिच्या ‘ब्लॅक’नंतर हा सिनेमा आल्याने प्रेक्षकांना तो चांगलाच भावला होता. गुजारिशऋतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉय स्टारर गुजारिशमध्ये ऋतिक ‘क्वाड्रोप्लेजिया’ नावाच्या आजाराने ग्रस्त असतो. या आजारात व्यक्ती दुसºयाच्या मदतीशिवाय अजिबात हालचाल करू शकत नाही. या बिमारीमुळे व्यक्ती पूर्णपणे पॅरालाइज्ड होतो. ऋतिकची भूमिका अशीच काहीसी असल्याने प्रेक्षकांना ती भावली. ब्लॅकरानी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन स्टार ‘ब्लॅक’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. ब्लॅकमध्ये अमिताभ बच्चन याने ‘अल्जायमर’ या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली, तर रानी मुखर्जी हिने अंध मुलीची भूमिका साकारली. अल्जायमर या आजारामुळे विसरभोळेपणाचा त्रास उद्भवतो. बर्फीप्रियंका चोपडा आणि रणबीर कपूर यांची भूमिका असलेला ‘बर्फी’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. सिनेमात प्रियंका ‘आॅस्टिस्टिक’ म्हणजेच ‘आॅटिज्म’ नावाच्या आजाराने ग्रस्त असते. ‘आॅटिज्म’ एक मानसिक आजारी असून, ज्याची लक्षणे लहानपणापासूनच दिसतात. या आजारामुळे मुलांचा बौद्धिक विकास मंदगतीने होत असतो. गजनीआमिर खान स्टारर ‘गजनी’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. सिनेमात आमिरने अशा व्यक्तीची भूमिका साकारली होती, जो ऐंटरोग्रेड एमेंसिया नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारात व्यक्ती काही वेळानंतर सर्व काही विसरून जातो. म्हणजेच १५ मिनीटे अगोदर घडलेल्या सर्व घटना ही व्यक्ती विसरून जाते.