Join us  

कतरिना इतक्याच सुंदर दिसतात तिच्या बहिणी; पाहा सख्खा ७ बहिणींचा ग्रुप फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 6:57 PM

Katrina kaif: कतरिनाला तीन मोठ्या आणि तीन तिच्यापेक्षा लहान बहिणी आहेत. तसंच त्यांना एक भाऊदेखील आहे.

अभिनयापेक्षाही सौंदर्यामुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ (katrina kaif). विदेशात लहानाची मोठी झालेली कतरिना आज बॉलिवूडमध्ये तिचं हक्काचं स्थान निर्माण करुन आहे. काही महिन्यांपूर्वीच कतरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलं. त्यामुळे ही जोडी या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतात. परंतु, यावेळी कतरिना तिच्या बहिणींमुळे चर्चेत आली आहे.

अलिकडेच कतरिना आणि तिच्या बहिणींनी मिळून त्यांच्या आईचा ७० वा वाढदिवस साजरा केला.यावेळी संपूर्ण कैफ कुटुंबीय या बर्थडे पार्टीला हजर होते. विशेष म्हणजे या निमित्ताने पहिल्यांदाच कतरिनाच्या सगळ्या बहिणींना एकत्र पाहता आला. या वाढदिवसाचे काही फोटो कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काय आहे कतरिनाच्या भावंडांची नावं?

कतरिनाला तीन मोठ्या आणि तीन तिच्यापेक्षा लहान बहिणी आहेत. तसंच एक भाऊदेखील आहे. यात स्टेफनी, क्रिस्टीना आणि नताशा या तिच्या तीन मोठ्या बहिणी आहेत. तर, मेलिसा, सोनिया आणि इसाबेल या तिच्या धाकट्या बहिणी आहेत. तसंच कतरिनाच्या भावाचं नाव मायकल आहे.

दरम्यान,या फोटोमध्ये कतरिनाच्या सहा बहिणींसह तिचा भाऊदेखील दिसून येत आहे. त्यामुळे सध्या हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत कतरिनाने तिच्या आईला शुभेच्छाही दिल्या आहेत.

टॅग्स :कतरिना कैफबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा