Join us

नव्वदीच्या दशकातील ही अभिनेत्री दिसतेय इतकी वेगळी की तिला ओळखणे देखील होतंय कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 17:27 IST

मिनाक्षी शेषाद्री आता तर इतकी वेगळी दिसते की तिला ओळखणे देखील आपल्याला कठीण जाते. मिनाक्षीमध्ये गेल्या काही वर्षांत खूपच बदल झालेला आहे. 

ठळक मुद्देमिनाक्षीचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. ते परदेशात स्थायिक आहेत. त्याचमुळे मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच राहाते.

मिनाक्षी शेषाद्रीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिनाक्षीची गणना केली जात असे. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण मीनाक्षीने लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये काम न करता तिच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

मिनाक्षी शेषाद्री आता तर इतकी वेगळी दिसते की तिला ओळखणे देखील आपल्याला कठीण जाते. मिनाक्षीमध्ये गेल्या काही वर्षांत खूपच बदल झालेला आहे. 

मिनाक्षीचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. ते परदेशात स्थायिक आहेत. त्याचमुळे मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच राहाते. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे. काही वर्षांपूर्वी घायल वन्स अगेन हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्यावेळी मिनाक्षीच्या नावाची मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. त्याचदरम्यान दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबतचा तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत तिचा लूक खूपच बदलला होता.

मिनाक्षी चित्रपटसृष्टीत असताना तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. अभिनेता अनिल कपूर सोबत तिचे अफेअर असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण त्या दोघांनीही यावर मौन राखणेच पसंत केले होते. मिनाक्षी आणि गायक कुमार सानू यांच्या अफेअरची तर त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्री