बॉलिवूडची 'लेडी सिंघम' अर्थात राणी मुखर्जी हिच्या 'मर्दानी ३' या चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. ३० जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अशातच आता जे प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे डिजिटल हक्क प्रदर्शनापूर्वीच विकले गेले होते. ताज्या माहितीनुसार, 'मर्दानी ३' नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी दिलेल्या संकेतांनुसार, हा चित्रपट २७ मार्च २०२६ रोजी ऑनलाइन स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, ओटीटीवर हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना अजून महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा पार 'मर्दानी ३' या चित्रपटाने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे ५० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. राणी मुखर्जीच्या करिअरमधील हा आणखी एक यशस्वी चित्रपट ठरला असून, तिच्या 'शिवानी शिवाजी रॉय' या भूमिकेवर प्रेक्षक पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.
Web Summary : Rani Mukerji's 'Mardaani 3', a box office success, is set for OTT release. The film will stream on Netflix around March 27, 2026. The film has crossed ₹50 crore in India.
Web Summary : बॉक्स ऑफिस पर सफल रही रानी मुखर्जी की 'मर्दानी 3' ओटीटी पर रिलीज होने के लिए तैयार है। यह फिल्म नेटफ्लिक्स पर लगभग 27 मार्च, 2026 को स्ट्रीम होगी। फिल्म ने भारत में ₹50 करोड़ से अधिक की कमाई की है।