Join us  

जिहादपासून आपल्या मुलींना वाचवायचं असेल तर..; 'द केरळ स्टोरी'विषयी शरद पोंक्षेंची महत्त्वाची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 3:44 PM

Sharad ponkshe: अभिनेता शरद पोंक्षे यांनी हा सिनेमा पाहिला असून तो चित्रपट सगळ्यांनी आवर्जुन पाहावा असं आवाहन केलं आहे.

अनेक वादविवाद, विरोधानंतर 'द केरळ स्टोरी' (the kerala story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही हा चित्रपट चर्चेत येत आहे. या सिनेमात करण्यात आलेले दावे खोटे असल्याचं म्हणत पुन्हा एकदा त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. यामध्येच आता अभिनेता शरद पोंक्षे यांनी हा सिनेमा पाहिला असून तो चित्रपट सगळ्यांनी आवर्जुन पाहावा असं आवाहन केलं आहे. विशेषत: मुली, महिलांनी तो पाहावा हे त्यांनी सांगितलं आहे. या विषयी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी सिनेमाचा छोटेखानी रिव्ह्यूदेखील केला आहे.

काय म्हणाले शरद पोंक्षे?

'नमस्कार, मी काल 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिला आणि प्रचंड अस्वस्थ झालो. मी रात्रभर झोपू सुद्धा शकलो नाही. माझी सर्व हिंदी बंधू-भगिनींना विनंती आहे की, हा चित्रपट तुम्ही नक्की पाहा. हा चित्रपट पाहून माझ्या मनात विचार आला की हे आपल्याच बाबतीत का होतं. हिंदू मुलींना लव्ह जिहादमध्ये कसं अडकवलं जातं आणि त्या कशा अडकतात.. तर त्याचं कारण आहे की आपल्याला आपली संस्कृती माहीत नाही, परंपरा माहीत नाहीत. आपण मॉडर्न होण्याच्या नादात आपल्या मुलांना आपलीच संस्कृती शिकवली नाही. म्हणूनच ते आपल्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढतात आणि त्यांना फसवतात. प्रेमाचा आधार घेऊन आपल्या मुलींना फसवलं जातं. काही पक्ष याला विरोध करत आहेत पण त्याकडे लक्ष देऊ नका. हा चित्रपट तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे किती भयानक वास्तव आहे,' असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात, 'काही पक्ष हा चित्रपट खोटा आहे म्हणून ओरडत आहेत. पण जोपर्यंत आपल्या घरात आग लागत नाही तोवर हे कळत नाही. जेव्हा तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा तुमचे डोळे उघडणार आहेत का? त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे या जिहादपासून आपल्या मुलींना वाचवायचं असेल तर कृपया हा चित्रपट पहा.. कारण वेळ निघून गेली तर आपल्या हातात काहीच उरणार नाही.. त्यामुळे सावध व्हा.' 

दरम्यान, सुदीप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करत अनेकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. या सिनेमात अभिनेत्री  अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.

टॅग्स :शरद पोंक्षेसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड