Lalit Prabhakar:ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करत या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ललितने आजवर अनेक धाटणीच्या मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता हा अभिनेता थेट हिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव 'वन टू चा चा चा'असं आहे. युनिक नावाप्रमाणेच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी हटके अनुभवायला मिळणार एवढं नक्की!
पेल्युसिडार प्रॉडक्शन प्रा.लि.'वन टू चा चा चा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक ठाकूर आणि रजनीश ठाकूर यांच्या खांद्यावर आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. ज्याचा आनंद संपूर्ण कुटुंबासोबत घेता येईल. ललितच्या या चित्रपटाबद्दल आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटात ललित प्रभाकरसह अभिनेते आशुतोष राणा,अभिमन्यू सिंग,हर्ष मायर, नायरा बॅनर्जी,अनंत वी. जोशी आणि मुकेश तिवारी अशा तगड्या कलाकारांची फळी आहे. येत्या ३१ ऑक्टोबर २०२५ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वन टू चा चा चा' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार विजेते हर्षवर्धन रमेश्वर यांनी संगीत दिलं आहे.
दरम्यान, या चित्रपटाबद्दल बोलताना ललित प्रभाकर म्हणाला,“हा चित्रपट म्हणजे चक्क हास्यकल्लोळ आहे! त्याचं शूटिंग करतानाच आम्ही पोट धरून हसलो आणि प्रेक्षकांनाही असाच अनुभव चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहताना येणार आहे.” अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.