Join us  

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी अतुल कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले, "हा चित्रपट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 2:18 PM

अतुल कुलकर्णींनी केलं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं कौतुक, खास पोस्ट शेअर करत म्हणाले...

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रतिक्षेत प्रेक्षक होते. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला हा फॅमिली ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट गृहात गर्दी करत आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णींनी या चित्रपटाबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

अतुल कुलकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन करण जोहर आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. करण जोहरच्या या चित्रपटाचं कौतुक करत अतुल कुलकर्णींनी खास पोस्ट लिहिली आहे. "हा चित्रपट! मॉडर्न चित्रपट हवा आहे? बोल्ड चित्रपट हवा आहे? मनोरंजक चित्रपट हवा आहे? व्यावसायिक चित्रपट हवा आहे? उत्कर्ष कथा असलेला चित्रपट हवा आहे? वर्तमान आणि भविष्यावर भाष्य करणारा चित्रपट हवा आहे? तर तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आहे," असं अतुल कुलकर्णींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. चाहत्यांप्रमाणे अतुल कुलकर्णींनाही हा चित्रपट आवडला असल्याचं त्यांच्या पोस्टवरुन लक्षात येतं. 

"माणूस गेल्यावर त्याचं कुटुंबीय...", नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना गश्मीरने सुनावलं

दोन्ही पत्नींबरोबर एकाच घरात राहतात सलीम खान, सावत्र आईबाबत अरबाज म्हणाला, "हेलन यांनी..."

दरम्यान, करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटात रणवीर आणि आलियाबरोबर धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही या चित्रपटात झळकली आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. २८ जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांत ६७ कोटींची कमाई केली आहे. 

टॅग्स :करण जोहररणवीर सिंगआलिया भटअतुल कुलकर्णी