Join us  

मनोज वाजपेयी यांनी मुंबईत खरेदी केली ऑफिससाठी नवी जागा; किंमत आहे कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 1:24 PM

मनोज वाजपेयी यांनी मुंबईत नवीन ऑफिससाठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

बॉलिववूडमध्ये असेही काही तगडे कलाकार आहेत ज्यांनी स्वबळावर आपलं नाव कमावलं आहे. यातीलच एक हरहुन्नरी प्रतिभावंत कलाकार मनोज वाजपेयी. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या अभिनेत्यानं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत वेगळी छाप सोडली आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या 'बंदा' सिनेमातील अभिनयासाठी त्याचं भरभरून कौतुक झालं. आता मनोज वाजपेयी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  मनोज वाजपेयी यांनी मुंबईत नवीन ऑफिससाठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. 

मनोज वाजपेयी यांनी ओशिवराच्या 'सिग्नेचर' इमारतीमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्याची किंमत सुमारे 31 कोटी रुपये आहे. मनोज यांनी मात्र याविषयी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. याच इमारतीमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन, सारा अली खान, अजय देवगण, काजोल आणि कार्तिक आर्यन यांनीही स्वतःची कार्यालये खरेदी केली आहेत. 

मनोज यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचा 'सिर्फ एक बंदा काफी है' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अल्पवयीन मुलीवर ढोंगी बाबाने केलेल्या बलात्काराची केस लढवणाऱ्या वकिलाची भूमिका मनोज साकारताना दिसले. तर त्यांचा 'गुलमोहर' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या सिनेमात त्यांनी शर्मिला टागोर यांच्या मुलाची भूमिका केली होती. तर लवकरच त्यांची 'फॅमिली मॅन 3' ही सिरीज येत आहे, ज्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी