Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या महिन्याभरातच अभिनेत्याच्या कुटुंबात सुरु झाले वाद, भांडणाचा व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 18:26 IST

अभिनेत्याने १५०० कोटींच्या मालकीण असलेल्या भूमाशी लग्न केल्यामुळे तो चर्चेत होता. आता त्याच्या घरातील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

अभिनेता मनोज मंचूने(Manoj Manchu) अलिकडेच भूमा भूमिकाशी लग्न केले आहे, त्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आता त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्याचा त्याचा भाऊ विष्णू मंचूसोबतच्या वादाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंचू मोहन बाबूची दोन्ही मुले मंचू विष्णू आणि मंचू मनोज यांचे अज्ञात ठिकाणी भांडण झाले. फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत मनोज मंचूने त्याचा सावत्र भाऊ मंचू विष्णू (Manchu Vishnu) वर त्याचे मित्र आणि कुटुंबीयांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

मनोजने संताप व्यक्त करताना सांगितले की, मंचू विष्णूने त्याचा जवळचा मित्र सारथी याला मारहाण केली आहे. मचूंनी विष्णू सारथीच्या घरी जाऊन मारहाण केली. दोघांमधील वाद आणि या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ मनोजने फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे. अभिनेत्याने कमेंट करत लिहिले की विष्णू बहुतेकदा असे करतो. वाद वाढत गेल्यावर मंचू मनोजने  पोलिसांना घरी बोलवले. 

व्हायरल व्हिडिओमध्ये कोणीतरी मंचू विष्णूला थांबवताना दिसत आहे आणि दरवाजा बंद असताना कोणी बाहेरून ठोठावत आहे. रिपोर्ट्सनुसार, मंचू विष्णू आणि मनोज यांच्या कुटुंबात गेल्या काही महिन्यांपासून मतभेद होते.तसेच, 1500 कोटींची मालकिण असलेल्या भूमा मौनिकाशी त्याचे लग्न झालेल त्याच्या सावत्र भावाच्या कुटुंबाला आवडले नाही. आता मंचू मनोजने त्याच्या कौटुंबिक वाद सार्वजनिक केले आहेत. 

 

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, मनोज शेवटचा 'ऑपरेशन 2019' चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्याची छोटी भूमिका केली होती. सध्या तो त्याच्या 'अहम ब्रह्मास्मि'चे शूटिंग करत आहे पण काही कारणांमुळे तेही बाकी आहे.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी