Join us  

एकाने मागणी केली शाहरूखसारखा बर्थडे साजरा करून दे, सोनू सूदने दिलं मन जिंकणारं उत्तर....

By अमित इंगोले | Published: November 04, 2020 9:43 AM

अनेक सोशल मीडिया यूजर्ससोबत सोनू संवादही साधतो आणि त्यांच्या ट्विटला रिप्लायही देतो. आता काही लोक सोनू सूदकडे फार विचित्र मागण्याची करतात.

लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने हजारो प्रवासी मजूरांना मदत केली आणि त्याचं हे मदतीचं काम अजूनही सुरूच आहे. लोक त्याच्याकडे सोशल मीडियात स्वत:साठी किंवा दुसऱ्यांसाठी मदत मागतात. तसेच सोनू सूद हा प्रत्येकाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्नही करतो.

दरम्यान अनेक सोशल मीडिया यूजर्ससोबत सोनू संवादही साधतो आणि त्यांच्या ट्विटला रिप्लायही देतो. आता काही लोक सोनू सूदकडे फार विचित्र मागण्याची करतात. ज्यावर त्याला आणि इतरांनाही हसू येतं. नुकतीच एका यूजरने वेगळी मागणी केली आणि साोनू सूदने त्यावर मन जिंकणारं असं उत्तर दिलं आहे. एका यूजरने मागणी केली की, त्याचा वाढदिवस शाहरूख खान स्टाइलने साजरा करून हवा आहे.

शाहरूखला केलं गेलं खास विश

नुकताच बॉलिवूड किंग खान शाहरूख खानचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर त्याला खास पद्धतीने विश करण्यात आलं. या इमारतीवर हॅपी बर्थडे शाहरूख खान असा मेसेज लिहिला गेला आणि त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांचे फोटोही इमारतीवर बघायला मिळाले.

यूजरने केली डिमांड

हे फोटो शेअर करत एका ट्विटर यूजरने लिहिले की, 'सोनू सर ५ नोव्हेंबरला बर्थ डे आहे. असंच बुर्ज खलिफावर सेलिब्रेशन करवून द्या प्लिज'. यावर सोनूने मजेदार रिप्लाय देत लिहिले की, 'बस तुमचा वाढदिवस ३ दिवस उशीरा आला आहे भाऊ. असो, थोडी मेहनत कर आणि नाव कमव जीवनात. मग बघ, बुर्ज खलिफा काय..आकाशातही नाव लिहेल दुनिया'.

सोनूने शाहरूखला केलं विश

याआधी शाहरूख खानने २ नोव्हेंबरला ५५वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचे मित्र, परिवारातील लोक आणि फॅन्सनी त्याला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोनू सूदनेही दोघांचा एक फोटो शेअर करत शाहरूखला विश केलं होतं. 

टॅग्स :सोनू सूदशाहरुख खानबॉलिवूडसोशल मीडिया