बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. दिल राजू यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला सध्या 'सीवीसी ६३' असे तात्पुरते नाव देण्यात आले असून, चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे.
सलमान खानला भिडणार 'हा' तगडा विलेन?
या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये सलमान खानला कोण टक्कर देणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. सुरुवातीला अभिनेता अरविंद स्वामी याचे नाव चर्चेत होते, मात्र आता निर्मात्यांनी त्यांच्या नावाचा विचार सोडून दिला आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी दोन बड्या अभिनेत्यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातील एक नाव म्हणजे फहाद फासिल. फहाद हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याने यापूर्वी 'पुष्पा' फ्रँचायझीमध्ये खलनायक म्हणून आपली वेगळी छाप पाडली आहे.दुसरं नाव म्हणजे अक्षय खन्ना. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता अक्षय खन्ना याने 'छावा' आणि 'धुरंधर' सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे निर्माते सध्या या दोन अभिनेत्यांपैकी एकाची निवड करण्याच्या विचारात आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात सलमान खानसोबत लेडी सुपरस्टार नयनतारा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट?दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली आणि सलमान खान यांच्या या बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधीच जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट २०२७ मध्ये ईदच्या मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल.
Web Summary : Salman Khan's next film, tentatively titled 'CVC 63', may feature either Fahadh Faasil or Akshay Khanna as the villain. Nayanthara will also star in the movie, slated for a 2027 Eid release.
Web Summary : सलमान खान की अगली फिल्म, जिसका अस्थायी शीर्षक 'सीवीसी 63' है, में फहाद फासिल या अक्षय खन्ना खलनायक के रूप में दिख सकते हैं। नयनतारा भी फिल्म में होंगी, जो 2027 में ईद पर रिलीज होने वाली है।