Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ताज्या फोटोशूटचा फोटो शेअर करून अशी फसली मल्लिका शेरावत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:51 IST

काल-परवा प्रियांका चोप्रा ट्रोलिंगची बळी ठरली. आता मल्लिका शेरावतचा नंबर लागलाय. होय, प्रियांकानंतर मल्लिका शेरावत ट्रोलर्सची शिकार ठरली आहे. ...

काल-परवा प्रियांका चोप्रा ट्रोलिंगची बळी ठरली. आता मल्लिका शेरावतचा नंबर लागलाय. होय, प्रियांकानंतर मल्लिका शेरावत ट्रोलर्सची शिकार ठरली आहे. मल्लिकाने आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि मग ट्रोलर्सने मल्लिकाला तिच्या वाढत्या वयावरून ट्रोल करणे सुरु केले.मल्लिका, तू यात आंटी दिसतेय, असे एका ट्रोलरने लिहिले.  काहींनी आणखी पुढे जात, ‘मल्लिका शेरावत नावाची कुणी हिरोईन बॉलिवूडमध्ये होती, हे आता आठवत नाही’, असे कमेंट केली. तर अन्य एकाने ‘मल्लिकाचा चार्म आता हरवला,’ असे लिहिले. बहुतांश कमेंट्स या मल्लिकाच्या वाढत्या वयाबद्दल आहेत.अनेक वर्षांपासून मल्लिका बॉलिवूडमधून गायब आहे. पण सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. त्यामुळे आपल्या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो शेअर करताना अशा काही कमेंटस मिळतील, याची अपेक्षाही कदाचित मल्लिकाने केली नसेल. पण मल्लिकाचा हा ताजा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक तिच्या फॅशन सेन्सची जोरदार खिल्ली उडवताना दिसत आहेत.ALSO READ : ​डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स-वाईफसोबत काय करतेयं मल्लिका शेरावत?‘मर्डर गर्ल’ नावाने प्रसिद्ध झालेली मल्लिका ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’,‘गुरू’,‘हिस्स’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केलेय.पहिल्या चित्रपटात मल्लिकाने तिचे मूळ नाव रीमा लांबाच लावले होते. पण ‘मर्डर’ सिनेमापासून तिने रीमा लांबा नाव लावणे बंद केले. तिने आपल्या आईचे आडनाव शेरावत नाव वापरण्यास सुरुवात केली. आईने चित्रपटसृष्टीत जाण्यासाठी जो पाठिंबा दिला त्यासाठी मल्लिकाने शेरावत नाव धारण केले. बॉलिवूडमध्ये येण्याआधी मल्लिकाचे लग्न झाले होते. यानंतर दोघांचा घटस्फोटही झाला. तेव्हापासून मल्लिका सिंगल आहे. मध्यंतरी सिरले आॅक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योगपतीसोबतच्या तिच्या डेटींगच्या बातम्या आल्यात. दोघेही लवकरच लग्न करणार, अशीही चर्चा झाली. पण  अद्याप तरी हे लग्न मार्गी लागलेले नाही. आता चाहते म्हणतात त्याप्रमाणे मल्लिकाचे वय चेहºयावर दिसू लागले असेल तर मल्लिकाने लग्न सीरिअसली घेण्यास हरकत नाही.