Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘जब मलाला मेट प्रियांका चोप्रा....!’ पीसीने लिहिली लांबलचक पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 13:52 IST

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजईने केवळ दोन महिन्यांपूर्वी Twitter जॉईन केले होते. तेव्हापासून आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक अपडेट्स ती ...

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजईने केवळ दोन महिन्यांपूर्वी Twitter जॉईन केले होते. तेव्हापासून आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करतेय. नुकताच मलालाने एक फोटो शेअर केला. तोही प्रियांका चोप्रासोबतचा. प्रियांकाला भेटून मलाला हरकून गेली.युनिसेफची गुडविल अ‍ॅम्बिसीडर प्रियांका चोप्रा संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील ‘ग्लोबल गोल्स अवार्ड्स’मध्ये पोहोचली. यादरम्यान मलाला उपस्थित होती. मग काय, मलाला आणि प्रियांका एकत्र म्हटल्यावर एक ‘क्लिक’ तर बनतोच. दोघींनीही एकत्र पोझ दिली आणि केवळ एकत्र पोझ दिली नाही तर हा ‘फॅन मोवमेंट’ मलालाने Twitterवर शेअर केला. ‘मला विश्वास बसत नाहीयं की, मी प्रियांका चोप्राला भेटले,’ असे tweet तिने केले.प्रियांकानेही मलालाच्या या tweetला तेवढेच प्रेमळ शब्दांत उत्तर दिले. ‘ओह मलाला, तुझ्या भावनांना उत्तर द्यायला मला शब्द अपुरे पडतील. मला विश्वास बसत नाहीयं की, मी तुला भेटले. तू एक मोठ्या मनाची लहानशी मुलगी आहेस. तुझी प्रचंड मोठी उपलब्धी... मला अभिमान आहे,’असे प्रियांकाने लिहिले.ALSO READ : एमी अवार्ड्समध्ये निवेदिकेने केली चूक अन् नाराज झाले प्रियांका चोप्राचे चाहते!cnxoldfiles/उर्दूच्या सीक्रेट भाषेत पुन्हा गप्पा मारण्यासाठी मी आतूर आहे,’ असे प्रियांकाने लिहिलेय.