Join us

​मलायका सुखी संसाराच्या मार्गी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 19:59 IST

अरबाज खान सोबतच्या नात्याला वाचविण्यासाठी आणखी एक संधी देण्याच विचार मलायका अरोरा करीत असल्याची माहिती मिळतेय. मलायका व अरबाजमध्ये ...

अरबाज खान सोबतच्या नात्याला वाचविण्यासाठी आणखी एक संधी देण्याच विचार मलायका अरोरा करीत असल्याची माहिती मिळतेय. मलायका व अरबाजमध्ये दुरावा निर्माण झाल्यावर ही ते पुन्हा एकत्र येणार ही सुखद वार्ता आल्याने या दोघांतमध्ये पूर्वीसारखे आलबेल व्हावे असे सर्वांनाच वाटत असावे नाही का? मलायका अरोरा व अरबाज खान यांनी 18 वर्षे एकत्र संसार थाटल्यावर अचानक दोघे वेगळे राहत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मलायका तर आपल्या नात्याविषयी बोलायला तयार नाही. मात्र सारे दुख विसरून ती लाईफ एन्जॉय करण्यावर भर देत असल्याचे दिसते. नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामहून तिने न्यूयार्कमधील एका पार्टीचे फोटो पोस्ट के ले होते. तिचे हे फोटो पाहून अनेकांना ती आपले दु:ख विसण्याचा प्रयत्न करीत आहे असेच वाटले होते. पण एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मलायका अरबाज आपल्या नात्याला एक संधी देण्यास तयार झाले आहे. मुंबई मिररच्या बातमीनुसार दोघांनी आपले नाते तोडू नये यासाठी दोघांच्या कुटुंबाकडून दबाब टाकला जात आहे. यामुळे दोघेही आपल्या नात्याविषयी विचार करीत आहेत. अरबाज मलायकासोबत राहयला तयारच होता. आता मलायका देखील आपल्या नात्याला एक संधी देण्याचा विचार करीत आहे. दोघांना एकत्र आणण्याचे त्यांच्या कुटुंबाचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मलायकाचा बहीण अमृता अरोराने ‘ ते दोघेही (अरबाज व मलायका)आपला निर्णय घेण्यात सक्षम आहेत’ असे सांगितले होते. बातमीनुसार मलायकाची आई जायस व बहीण अमृताने तिला आपल्या नात्याला वाचविण्यासाठी एक संधी द्यावी असा सल्ला दिला होता. मलायकाने हा सल्ला मानला असून अरबाज आपल्या मुलांना घरी आणण्याची पूर्ण तयारी करीत आहे. बॉलिवूडचे हॉट कपल पुन्हा एकत्र येत असल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद साजार करण्याची एक संधी मिळत आहे.