मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आपल्या कथित रिलेशनशिपबद्दल अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण आता काहीही लपून राहिलेले नाही. सध्या दोघेही ज्याप्रमाणे एकमेकांसोबत बिनधास्त फिरताना दिसताहेत, त्यावरून तरी सगळे काही स्पष्ट आहे. अगदी अलीकडे अर्जुन व मलायका हे दोघेही वरूण धवन आणि नताशा दलालसोबत डीनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. आता अर्जुन कपूरची मलायकाच्या गर्ल गँगमध्ये एन्ट्री झालीय. होय, काल अर्जुन मलायकाच्या गर्ल्स स्क्वॉडसोबत दिसला. या पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत मलायका व अर्जुन अगदी एकमेकांना बिलगुन बसले आहेत. विशेष म्हणजे, हा फोटो महीप कपूरने शेअर केला आहे. महिप ही अर्जुनची काका संजय कपूरची पत्नी आहे. म्हणजे अर्जुनची काकू आहे. फोटोत करिना कपूर, अमृता अरोरा, सोफिया चौधरी असे अनेकजण आहेत.
मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 11:29 IST
अगदी अलीकडे अर्जुन व मलायका हे दोघेही वरूण धवन आणि नताशा दलालसोबत डीनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. आता अर्जुन कपूरची मलायकाच्या गर्ल गँगमध्ये एन्ट्री झालीय.
मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!!
ठळक मुद्देफोटोत मलायका व अर्जुन अगदी एकमेकांना बिलगुन बसले आहेत. विशेष म्हणजे, हा फोटो महीप कपूरने शेअर केला आहे.