Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका बिन लग्नाची गोष्ट..! अर्जुन कपूरसोबत लग्न केल्यानंतर मलायका अरोरा करणार नाही हे काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 15:30 IST

मलायका अरोरा व अर्जुन कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूर सध्या लॉकडाउनमुळे आपापल्या घरातच कैद आहेत. तरीदेखील ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. मलायका जेवण किंवा पदार्थ बनवितानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तर अर्जुनदेखील पदार्थाचे फोटो शेअर करताना दिसतो. नुकत्याच एका मुलाखतीत दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला.

जेव्हा ऑनलाइन मुलाखतीत अर्जुन कपूरला त्याच्या व मलायकाच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, जेव्हा लग्न करेन, त्यावेळी नक्की सांगेन. सध्यातरी लग्नाचा काही प्लान नाही आहे. त्यानंतर त्याने हसत म्हटले की आता करायची जरी असेल तरी आता करणार कसे सध्या याबद्दल काहीच ठरवलेले नाही. मात्र काहीच लपवणार नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, या वर्षखेरीस मलायका व अर्जुन लग्नबेडीत अडकू शकतात. एका दुसऱ्या मुलाखतीत मलायकाला अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबद्दल विचारले असता तिने काहीच उत्तर न देता टाळाटाळ केली. मात्र काही दिवसांपूर्वी मलायकाने लग्नानंतर तिला आणखीन एकदा आई व्हायचे असल्याचे सांगितले होते.

परंतु पर्दाफाश या वेबसाईटने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, मलायका लग्नानंतर आणखीन एका बाळाचा विचार करत नाही आहे. आधीच एका मुलाची आई असल्यामुळे तिचे मन नाही असे या वृत्तात म्हटलं आहे. 

मलायका जेव्हा पहिल्यांदा आई झाली होती त्यावेळी ती 29 वर्षांची होती आणि आता ती 42 वर्षांची आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर