Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन कपूरच्या प्रेमात का पडली मलायका, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 18:55 IST

मलायका अरोरा बऱ्याचदा सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अर्जुन कपूरसोबतच्या अफेयर व लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत असते.

मलायका अरोरा बऱ्याचदा सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अर्जुन कपूरसोबतच्या अफेयर व लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायकानं सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर ते दोघे न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तिथले फोटोदेखील सोशल मीडियावर पहायला मिळाले. हे फोटो खूप व्हायरल झाले होते. आता तर मलायकानं अर्जुनच्या प्रेमात का पडली, याचं कारणदेखील सांगितलं आहे. 

मलायका नुकतीच न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करून भारतात परतली आहे. यावेळी तिच्यासोबत अर्जुनही होता. मलायकाने काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा आपल्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला. 

मलायकानं अर्जुन कपूरचं नाव न घेता म्हणाली की, हे खूप अद्भूत आहे. जेव्हा माझं लग्न तुटलं तेव्हा मला मी पुन्हा कोणत्या रिलेशनशीपमध्ये पडेन, हे निश्चित नव्हते. माझं मन पुन्हा दुखावेल, ही भीती माझ्या मनात होती. मला एक रिलेशनशीप हवे होते आणि मला मिळालं. मी आता खूप खूश आहे. 

मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांच्यामध्ये अकरा वर्षांचा फरक आहे. मलायका ४५ वर्षांची आहे तर अर्जुन कपूर ३४ वर्षांचा आहे. त्यामुळे ते दोघे बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

वयाच्या अंतराबाबत विचारलं असता मलायका म्हणाली की, जेव्हा तुम्ही रिलेशनशीपमध्ये असता तेव्हा वयाचा विचार करत नाहीत. त्यात दोन मनं जुळतात.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर