हिनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग केले आहेत. ‘मोहल्ले में हुक्का’, ‘बेवड़ा-बेवड़ा’, ‘बेबो-बेबो’, ‘राजू ओ राजू’, ‘टकमक-टकमक’ आणि ‘बलम बंबई’ तिचे हे प्रचंड हिट झालेले आयटम सॉन्ग आहेत. हिनाविषयी कोरिओग्राफर सरोज खानने म्हटले होते की, ‘मी बॉलिवूडला एक नवी डान्सिंग दीवा आणि स्किल्ड डान्सर देत आहे.
दरम्यान, हिनाने तेलगू चित्रपटांव्यतिरिक्त तामिळ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने ‘हम है तीन खुराफाती, लाइफ में ट्विस्ट हैं, जस्ट गम्मट, मिस टनकपूर हाजिर हों, लोड्डे, रत्न मंजरी, यगाविरयनुम ना काक्का, बाबूजी एक टिकट बम्बई’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर तिने काही रिअॅलिटी शोमध्येदेखील आपला जलवा दाखविला आहे.
रिअॅलिटी शोच्या एका व्यासपीठावर तिने खºयाखुºया मलाइका अरोराची भेट घेतली होती. मलाइकादेखील तिला बघून आश्चर्यचकीत झाली होती. या साउथच्या मलाइका अरोराचे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार असून, तुम्ही यावर तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा...