Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोराने शेअर केले गोवा व्हॅकेशनचे फोटो, आपल्या हॉट अदांमधून सर्वांना केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:15 IST

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. बहिण अमृता अरोरा आधीपासून कुटुंबासोबत गोव्यात आहे. नवीन वर्षाला लवकरच सुरूवात होणार आहे. अशात मलायका अरोरा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्याला पोहचली आहे. त्या दोघांनी ख्रिसमसदेखील गोव्यातच साजरा केला होता.

नुकताच मलायका अरोराने ग्रीन लेपर्ड मोनोकिनीमध्ये स्वतःचे स्विमिंग पूलमधील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अर्जुन कपूरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. मलायका स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

याशिवाय मलायका बाल्कनीत उभी राहून प्लेन ग्रीन ब्रालेट आणि शॉर्ट्समध्ये पोझ देताना दिसते आहे. मलायका ज्या ठिकाणी थांबली आहे ते खूप आलिशान आहे.

अर्जुन आणि मलायका अमृता अरोराच्या घरी थांबले आहेत जे गोव्यातील कँडोलिम बीचवर बनले आहे. अर्जुन कपूरने अमृता आणि तिचा नवरा शकील लदाखच्या या आलिशान घराचे फोटो शेअर करत कौतूक केले आहे. अर्जुन कपूरने हे फोटो शेअर करत लिहिले होते की जेव्हा तुम्हाला कोणते ठिकाण सोडायचे मन करत नाही. अमृता आणि शकील तुम्ही काय घर बनविले आहे. गोव्यात इतर कोणतेच दुसरे चांगले हॉलिडे होम नाही. अमृता आणि शकीलने या घराचे नाव अजारा बीच हाउस ठेवले आहे.

अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा तो पानिपत चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले नाही. यात त्याच्यासोबत क्रिती सनॉन आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

त्यानंतर आता तो भूत पुलिसमध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानअमृता अरोरा